महामार्ग पोलिसांकडून बबली राणे यांचा सन्मान…
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴कसाल : दि. १९ ओसरगावचे माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते चंद्रहास ऊर्फ बबली राणे यांचा महामार्ग मदत केंद्रातर्फे सन्मानित करण्यात आले. महामार्ग मृत्युंजय दूत गट समारंभात राणे यांचा सत्कार करण्यात आला.
बबली राणे गेली पंचवीस वर्ष महामार्गावर होणारे अपघात ग्रस्तांना तसेच पोलिसांना मदत करत आहेत. कित्येक जखमींना यांनी रुग्णालयात पोहोचून जीवदान दिले आहे. लॉक डाऊन काळातही महामार्गावरून पायी चालत जाणाऱ्या वाटसरूंना जेवण पाणी या सुविधा पुरवल्या होत्या.
महामार्ग कणकवली ते ओसरगाव कसाल अपघात व तत्सम घटनांसाठी बबली राणे नागरिकांना व पोलिसांना सहकार्य करतात . यांचा याच कारणामुळे महामार्ग पोलिसांकडून गौरव करण्यात आला.
याप्रसंगी महामार्ग पोलीस विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अरुण जाधव,डॉ संजय पावसकर ,ओसरगाव सरपंच प्रमोद कावले , खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत आदी उपस्थित होते.
💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत.🔥
💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥
🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥
🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️
♦संपादक : सीताराम गावडे
📱संपर्क : +919423304856
♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड
📱संपर्क : +919423958828
♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे
📱संपर्क : +919405475712
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

