🛑मृत्यूवरही ३ हजारांचा भार?; सावंतवाडीत दहनासाठी लाकूड शुल्क रद्द करा!” – माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांची मागणी
*🛑मृत्यूवरही ३ हजारांचा भार?; सावंतवाडीत दहनासाठी लाकूड शुल्क रद्द करा!” – माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांची मागणी*
*🛑वेंगुर्ला नगरपरिषदेच्या धर्तीवर सावंतवाडीतही अंत्यविधीसाठी लागणारी लाकडे मोफत द्यावीत; गरीब कुटुंबांवरील आर्थिक ओझे कमी करण्यासाठी नगरपरिषदेकडे निवेदन देणार*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १४:-* सावंतवाडी नगरपरिषदेने शहरातील नागरिकांना स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी लागणारी जळाऊ लाकडे पूर्णपणे मोफत उपलब्ध करून द्यावीत, अशी ठाम मागणी सावंतवाडी शहर हितवर्धक मंचाचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक सुरेश बाळकृष्ण भोगटे यांनी केली आहे. सध्या नगरपरिषद दहनासाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडांबाबत सुमारे २,९७० रुपये (जवळपास ३ हजार रुपये) शुल्क आकारत असून, ही रक्कम गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबांसाठी मोठा आर्थिक बोजा ठरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भोगटे यांनी सांगितले की, बाजारात दहनासाठी लागणाऱ्या लाकडांची किंमत साधारण ८०० ते ९०० रुपये इतकी असताना नगरपरिषद जवळपास तीन हजार रुपये आकारत आहे. दुःखाच्या प्रसंगी कुटुंब आधीच मानसिक आणि आर्थिक संकटात असते. अशा वेळी नगरपरिषदेने नागरिकांना दिलासा देण्याऐवजी एवढे मोठे शुल्क आकारणे योग्य नसल्याची टीका त्यांनी केली.
सावंतवाडीतील नागरिक नियमितपणे करपट्टी, स्वच्छता कर आणि इतर कर वेळेवर भरत आहेत. त्यामुळे शहरातील गरीब व गरजू कुटुंबांना किमान अंत्यविधीसारख्या अत्यंत संवेदनशील प्रसंगी नगरपरिषदेने सामाजिक जबाबदारी स्वीकारून दहनासाठी लागणारी लाकडे सरसकट मोफत उपलब्ध करून द्यावीत, अशी त्यांची मागणी आहे.
यासंदर्भात नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष आणि मुख्य अधिकारी यांना लवकरच निवेदन देण्यात येणार असल्याचेही भोगटे यांनी स्पष्ट केले. वेंगुर्ला नगरपरिषदेने दहनासाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडावरील शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर सावंतवाडी नगरपरिषदही तातडीने निर्णय घेईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
“नागरिकांकडून विविध कर वसूल करणाऱ्या नगरपरिषदेने, आयुष्यातील सर्वात दुःखद प्रसंगीही तीन हजार रुपयांचे शुल्क आकारणे कितपत न्याय्य आहे?” असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांतून उपस्थित होत आहे. सावंतवाडी नगरपरिषद यावर संवेदनशील निर्णय घेणार का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

