◾ नाटळ गावचे सुपुत्र डॉ. प्रसाद मुंडले यांनी केली एमबीबीएस पदवी प्राप्त ; सर्व ठिकाणावरून अभिनंदनाचा वर्षाव
◾ नाटळ सारख्या खेडेगावात राहून मराठी माध्यमात शिक्षण घेवून वैद्यकिय पदवी..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी, दि-१८:- नाटळ गावचे सुपुत्र व मा वि न नाटळ गावचे सुपुत्र व माध्यमिक विद्यालय चे माजी विध्यार्थी डॉ प्रसाद पराग मुंडले यांनी आपले पदवी पर्यंतचे वैद्यकिय शिक्षण पूर्ण करून नुकतीच एमबीबीएस पदवी प्राप्त केली आहे . यामुळे नाटळ गावाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला आहे .
त्यांनी आतापर्यंत माध्यमिक विद्यालय नाटळ, संजीवन पब्लिक स्कुल पन्हाळा आणि शाहू कॉलेज लातूर असा आपला शैक्षणिक प्रवास करून सीईटी परीक्षेत ९१% गुण प्राप्त केले. शासकीय वैद्यकिय महाविद्यालय मिरज येथुन वैद्यकिय शिक्षण व इंटर्नशिप पूर्ण झाल्यावर नुकतीच त्यांना वैद्यकिय पदवी प्रदान करण्यात आली.
नाटळ सारख्या खेडेगावात राहून मराठी माध्यमात शिक्षण घेवून वैद्यकिय पदवी पर्यंतचे यश प्रसाद मुंडले यांनी मिळविले आहे. एमबीबीएस पर्यंतचे शिक्षण घेतलेला माध्यमिक विद्यालय नाटळ प्रशालेचे हे पहिलेच विद्यार्थी आहेत . या कौतुकास्पद कामगिरीबद्दल प्रशालेचे शिक्षक, ग्रामस्थ आणि मित्रपरिवार यांच्याकडून प्रसाद मुंडले याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

