◾ दुर्मिळात दुर्मिळ गोष्ट सापडली माणूसकीमुळे
◾ कराड येथील हेड कॉन्स्टेबल विष्णू मर्डेकर यांनी दाखवली माणुसकी
◾ कराडहून सावंतवाडीपर्यंत मदतीसाठी हाक; रुग्णाच्या नातेवाईकांनी मानले देव्या सूर्याजी, मंगेश तळवणेकर यांचे आभार..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी, दि-१७ :- कराड येथील मुनेरा बागवान या पेशंटना एबी पॉसिटीव्ह प्लाझ्मा ची आत्यंतिक तातडीने आवश्यकता होती.परंतु ज्या लोकांना कोविड 19 याआधी होऊन गेला आहे,अशाच व्यक्तीचा शोध सुरू होता. त्यामुळे अशा व्यक्तीचा शोध घेणे कठीण होऊन बसले. याही पुढे जात एबी पॉसिटीव्ह हा दुर्मिळ रक्तगट असलेली व्यक्तीचा शोध घेणे हे मोठे जिकिरीचे काम होते.अशा व्यक्तीचा शोध घेणे कराड पासून सुरू झाले… आणि सगळीकडे अशी व्यक्ती शोधण्यासाठी प्रयत्न होऊ लागले. कराडहून संबंधितांच्या नातेवाईकांनी सगळीकडे शोधाशोध सुरू केली. त्यांनी सावंतवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते माजी सभापती श्री मंगेश तळवणेकर आणि युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष श्री.देव्या सूर्याजी यांच्याशी संपर्क केला. सावंतवाडी आणि आजूबाजूच्या परिसरात अशी व्यक्ती शोधण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले.देव्या सुर्याजी यांनी विशेष प्रयत्न करत कोल्हापूर येथून दोन व्यक्ती तयारही केल्या मात्र कोविड निगेटिव्ह प्लाझ्मा ची गरज असल्याने त्या व्यक्ती तिथे जाऊ शकल्या नाहीत.
मात्र कराड आगाशिवनगर येथील हेड कॉन्स्टेबल श्री विष्णू केशव मर्डेकर यांनी माणुसकी दाखवून प्लाझ्मा दान केले व संबंधितांचे प्राण वाचवले.याबाबत त्यांचे सर्व स्तरात कौतुक होत आहे.
दरम्यान रुग्णांच्या नातेवाईकांनी देव्या सुर्याजी आणि मंगेश तळवणेकर यांचे,”आपने कोशीश की इसलीये आप का बहुत शुक्रिया”या शब्दात आभार मानले.’अशा व्यक्तींनी पुढे येत रक्तदान करणे गरजेचे आहे’ अशी भावना यावेळी तळवणेकर, देव्या सूर्याजी यांनी व्यक्त केली.


AB+ दूर्मिळ नसतो, AB- जास्त दूर्मिळ असतो. AB+ ला A+, B+, O+ चालतात.