🛑अंधारात सावंतवाडी मतदारसंघ,संतप्त जनतेचा आमदार दीपक केसरकरांवर थेट निशाणा!
*🛑अंधारात सावंतवाडी मतदारसंघ,संतप्त जनतेचा आमदार दीपक केसरकरांवर थेट निशाणा!*
*🛑कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूजच्या संपादकीयनंतर ३०० हून अधिक प्रतिक्रिया; “चार टर्ममध्येही प्रश्न कायम”*
*🛑”आपत्कालीन बैठका केवळ दिखावा”, “महावितरण अधिकाऱ्यांवरही वचक नाही” अशा संतप्त भावना व्यक्त.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०८:-*”अंधारात ढकललेला सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ; महावितरणच्या निष्क्रियतेचा शाप कधी संपणार?” या विषयावरील कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूजच्या संपादकीयानंतर वाचकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत जवळपास ३०० हून अधिक नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. या प्रतिक्रियांमध्ये स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
अनेक नागरिकांनी आमदार दिपक केसरकर यांचा निवडणुकीनंतर मतदारसंघाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे. वीजपुरवठा, पर्यटन, हॉटेल व्यवसाय, ग्रामीण जनजीवन, सार्वजनिक बांधकाम आणि आरोग्य व्यवस्था या सर्वच क्षेत्रांत सातत्याने समस्या निर्माण होत असताना त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना झालेल्या नसल्याची भावना प्रतिक्रियांमधून व्यक्त झाली आहे.
संजय देसाई यांनी, “आपत्कालीन आढावा बैठका संकट ओढवल्यानंतर नव्हे, तर एप्रिल-मे महिन्यात आधीच व्हायला हव्यात. चार वेळा आमदार असूनही हे नियोजन न होणे दुर्दैवी आहे,” असा टोला लगावला.मनोज घाटकर यांनी, “सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महावितरणचा कारभार अनागोंदीचा झाला आहे. तात्पुरती मलमपट्टी करून प्रश्न मिटवले जातात. स्थानिक बेरोजगार हवालदिल झाले आहेत,” अशी टीका केली.शंकर जाधव यांनी, “मतदारसंघातील आरोग्य, वीज आणि विकासाच्या प्रश्नांवर आक्रमकपणे पाठपुरावा झालेला दिसत नाही. यंत्रणांचे स्वतंत्र ऑडिट होणे आवश्यक आहे,” असे मत व्यक्त करत शेजारच्या कुडाळ मालवण मतदारसंघातील विकासकामांचा उल्लेख केला.
सगुण सामंत यांनी, “घोषणांपलीकडे ठोस काम दिसत नाही. आता कार्यपद्धतीत बदल होण्याची वेळ आली आहे,” अशी प्रतिक्रिया नोंदवली.
दरवर्षी मान्सूनपूर्व आपत्कालीन नियोजन बैठका एप्रिल किंवा मे महिन्यात घेऊन संबंधित यंत्रणांना जबाबदाऱ्या निश्चित करणे अपेक्षित असते. मात्र प्रत्यक्ष संकट निर्माण झाल्यानंतरच बैठका होत असल्याने त्यातून ठोस निष्पन्न होत नसल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.
काल आयोजित करण्यात आलेल्या आपत्कालीन बैठकीला महावितरणचे अधिकारी उशिरा पोहोचल्याचा उल्लेख करत राजेश सावंत यांनी, “यावरून अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधींचा किती प्रभाव आहे, याचे चित्र स्पष्ट होते. संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून शिस्त लावण्याची गरज आहे,” अशी प्रतिक्रिया दिली.
एकूणच, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील वीज, पर्यटन, पायाभूत सुविधा आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेबाबत नागरिकांमध्ये तीव्र असंतोष असून, प्रश्नांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी ठोस आणि वेळेत निर्णय घेण्याची मागणी अधिक जोर धरू लागली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

