तुरंबवमध्ये पुन्हा विकासपर्व भास्करराव जाधव यांचा विकास कामांचा झंजावात

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण : दि. १७ गुहागर – चिपळूण – खेड मतदारसंघाचे आमदार भास्करराव जाधव हे नेहमीच विकासाचं राजकारण करतात आणि म्हणूनच सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठिशी कायम राहिली आहे. मतदारसंघाचा विकास करताना स्वतःचे गाव असलेल्या तुरंबव गावच्या विकासात त्यांनी कुठलीही कसर ठेवलेली नाही. मागच्या पाच वर्षात ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात नव्हती. पण, ज्यांच्या ताब्यात होती त्यांना काहीही करता आलं नाही, हे ग्रामस्थांना कळून चुकलं आणि ती चुक यावेळी त्यांनी सुधारली. गावाने सुनील जाधव यांचे पॅनल बहुमताने निवडून दिले. ग्रामपंचायत पुन्हा ताब्यात आल्यानंतर आमदार श्री. जाधव यांनी पुन्हा एकदा गावच्या विकासासाठी कंबर कसली आहे. गावात एखादं सुसज्ज बहुउद्देशीय सभागृह असावं अशी इच्छा त्यांचे बंधू सुनील जाधव व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची  होती. त्यांनी ती बोलून दाखवतातच आ. श्री. जाधव यांनी तात्काळ त्यासाठी ५० लाख रूपयांचा निधी  उपलब्ध करून दिला.

गावात असलेल्या शासकीय जागेमध्ये हे सभागृह उभं करण्याचे निष्चित झाल्यानंतर आज या भागाच्या दौऱ्यावर असताना त्यांनी प्रत्यक्ष  जावून जागेची पाहणी केली. याच जागेमध्ये त्यांनीच मंजूर केलेले प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पशुवैदयकीय दवाखानासुध्दा होणार आहे. त्याबाबतही त्यांनी चर्चा करून माहिती घेतली.

यावेळी माजी सरपंच व विदयमान सदस्य सुनील जाधव,  आ. श्री. जाधव यांच्या पत्नी सौ. सुवर्णावहिनी जाधव, माजी सरपंच गुणाजी भुवड, सौ. नम्रता पंडित, सदस्या सौ. सेजल बाईत, राम घाग, अजित पालशेतकर, श्री. सकपाळ, नंदकुमार पंडित, अनिल कोतवडेकर, अनिल  शिगवण, अरूण गुरव, सुधीर मोहिते, सिध्देश शिगवण, सौ. अनिता शिगवण, दिपक पाष्टे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत.🔥

💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥

🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥

🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️
♦संपादक : सीताराम गावडे
📱संपर्क : +919423304856
♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड
📱संपर्क : +919423958828
♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे
📱संपर्क : +919405475712

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!