कोकणक्राइमसावंतवाडीसिंधुदुर्ग

दुचाकीच्या धडकेत युवा सेना पदाधिकारी विशाल सावंत गंभीर जखमी

*💫सावंतवाडी दि.१६-:* रस्ता ओलांडताना एका अज्ञात दुचाकी स्वाराने धडक दिल्याने युवासेना शहर अधिकारी विशाल सावंत हे गंभीर जख्मी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना पडवे येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

ही घटना आज रात्री उशिरा ११:३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यावेळी त्या दुचाकी स्वाराने तेथे उभ्या असलेल्या अन्य दोन दुचाकीस्वारांना देखील धडक दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!