◾ फुटपाथवर सापडलेली सोनसाखळी पोलिसांनी ओळख पटवुन दिली अखेर मालकाच्या ताब्यात..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी, दि-१६:- सोनुर्ली येथील अमोल गावडे या युवकाला सापडलेली ती सोन साखळी पोलिसांनी ओळख पटवुन अखेर मालकाच्या ताब्यात दिली.
सुनिता मोहन कारेकर रा. माजगाव कासारवाडी या महिलेची ती साखळी होती. तिने साखळी परत केल्याबद्दल अमोल याचे आभार व्यक्त केले.
सावंतवाडी येथे बाजारात आलेल्या सोनुर्ली येथील अमोल गावडे याला 8 मार्चला सायंकाळी साडेपाच वाजता नगरपरिषदेच्या समोर फुटपाथवर सोनसाखळी सापडून आले होते सदरची सोनसाखळी प्रामाणिकपणे अमोल याने दोन पोलिसांकडे सुपूर्त केले होती. ज्या कोणाची हि सोनसाखळी आहे त्याला ती खात्री पटवून स्वाधीन करा असेही अमोल याने पोलिसांना सांगितले होते दरम्यान पोलिसांनी पंचनामे अंती सदरची साखळी आपल्या ताब्यात घेतली होती.
याबाबतचे वृत्त सोशल मीडिया तसेच वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आले होते सदरचे वृत्त प्रसिद्ध होताच ते वाचल्यानंतर संबंधित महिलेच्या भाच्याने आपल्या मामाला कल्पना दिली त्यानंतर आज सायंकाळी सुनिता ही महिला आपल्या भावासह पोलीस ठाण्यात दाखल झाली तिने सोबत येताना ज्या सोनाराकडे सोनसाखळी बनवली त्याचे कागद पोलिसांना सादर केले पोलिसांनी खातरजमा करून अमोल गावडे यांना बोलावून त्याच्या समक्ष सदरची सोनसाखळी तिच्याकडे सुपूर्त केली.
श्रीमती कारेकर माजगाव येथे आपल्या भावाकडे गेली कित्येक वर्षे राहतात सावंतवाडी येथे एका दुकानात त्या कामाला आहेत रोज कामावरून सुटल्यावर नगर परिषदेकडील बस स्टॉप वर त्या एसटीसाठी थांबतात सोमवार 7 मार्चला ही त्या बस स्टॉप वर एसटी साठी थांबल्या होत्या यावेळी गळ्यातील सोनसाखळी कधी तुटून खाली पडली ते त्यांच्या लक्षात आले नाही घरी गेल्यानंतर आंघोळ करताना त्यांच्या आपल्या गळ्यातील सोनसाखळी गहाळ झाल्याचे लक्षात आले असे त्यांनी पोलिसांना सांगितले. मात्र आपली सोनसाखळी परत मिळाल्याने त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू निघाले.

