कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची अभूतपूर्व आर्थिक झेप; ७,१७६ कोटींच्या व्यवसायाचा ऐतिहासिक टप्पा!

*🛑सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची अभूतपूर्व आर्थिक झेप; ७,१७६ कोटींच्या व्यवसायाचा ऐतिहासिक टप्पा!*

 

*🛑४३ व्या वार्षिक सभेत अध्यक्ष मनीष दळवी यांची घोषणा; ठेवी, कर्जवाटप आणि डिजिटल सेवांमध्ये राज्यात आघाडी, पुढील वर्षी ८,५०० कोटी व्यवसायाचे लक्ष्य.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुनगरी, दि- ०१:-* सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (दि. १ जुलै) बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त उत्साहात पार पडली. यावेळी अध्यक्ष मनीष दळवी यांनी आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील बँकेच्या उल्लेखनीय प्रगतीचा आढावा घेत आगामी वाटचालीचा आराखडा सभासदांसमोर मांडला.

आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये बँकेला ६०९.४५ कोटी रुपयांच्या नवीन ठेवी प्राप्त झाल्या असून, एकूण ठेवी ३,९४२.५७ कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत. १८.२८ टक्के ठेववाढीसह कोकणातील सर्व जिल्हा बँकांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

कर्जवाटपातही बँकेने ४७२.०१ कोटी रुपयांची वाढ नोंदवत एकूण कर्जव्यवहार ३,२३३.६४ कोटी रुपयांवर नेला आहे. परिणामी, बँकेचा एकूण व्यवसाय प्रथमच ७,००० कोटींचा टप्पा ओलांडत ७,१७६.२१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

अध्यक्ष दळवी यांनी सांगितले की, शेतकरी, उद्योजक, महिला, युवक, कारागीर आणि सर्वसामान्य ग्राहकांना दर्जेदार व आधुनिक बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी बँक सातत्याने प्रयत्नशील आहे. जिल्ह्यातील विकास संस्थांचे १०० टक्के संगणकीकरण, डिजिटल बँकिंग सुविधा, ‘बँक सखी’ उपक्रम, AEPS सेवा, मायक्रो एटीएम आणि ‘डोअर स्टेप बँकिंग’ यांसारखे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.

बँक सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती अभियान, व्यावसायिक प्रशिक्षण, बचत गटांना सहाय्य, स्वयंसेवी संस्थांमार्फत विकासकामे तसेच ‘बालसिंधू दत्तक योजना’ यांसारखे सामाजिक उपक्रमही राबवत असल्याचे त्यांनी नमूद केले.

सभासद, ठेवीदार, कर्जदार आणि ग्राहकांच्या विश्वासामुळेच बँकेची सातत्याने प्रगती होत असून, येत्या आर्थिक वर्षअखेर बँकेचा एकूण व्यवसाय ८,५०० कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी उपाध्यक्ष अतुल काळसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई तसेच सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!