◾ शहरातील पाणीपुरवठा पंधरा दिवसात सुरळीत करा अन्यथा उपोषण; अनारोजीन लोबो
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी दि.१२-: सावंतवाडी शहरात काही ठिकाणी पाणी पुरवठा २४ तास होत असून, काही ठिकाणी दोन वेळा तर काही ठिकाणी एकच वेळ पाणी पुरवठा का होत आहे असा सवाल ज्येष्ठ नगरसेविका आनारोजिन लोबो यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे. यापूर्वी कधीच जानेवारी महिन्यात पाणी टंचाई उद्भवली नाही. असे देखील त्या म्हणाल्या आहेत. धरणात पाणी योग्य प्रकारे असताना टाकीत येणारे पाणी कुठे गायब होते याचा शोध घेऊन मुख्याधिकारी यांनी १५ दिवसात घेऊन पाणी पुरवठा सुरळीत करावा अन्यथा सेनेच्या सर्व नगरसेवकांना तसेच पाणी पुरवठा कमी होणाऱ्या प्रभागातील लोकांना घेऊन उपोषण करणार असा इशारा पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नगरसेविका अनारोजिन लोबो यांनी दिला आहे.

