कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑कास्ट्राईब कर्मचारी महासंघ आरोग्य विभाग जिल्हाध्यक्षपदी दीपक कांबळे बिनविरोध.

*🛑कास्ट्राईब कर्मचारी महासंघ आरोग्य विभाग जिल्हाध्यक्षपदी दीपक कांबळे बिनविरोध.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- १८:-* कास्ट्राईब कर्मचारी महासंघ आरोग्य विभाग संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी दीपक कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संघटनेच्या महासचिवपदी संतोष बनसोडे, कोषाध्यक्षपदी आर. डी. चेंदवणकर यांचीही बिनविरोध निवड झाली.

आरोग्य कर्मचारी संघटनेची बैठक नुकतीच माध्यमिक शिक्षक पतपेढी येथे महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र कदम यांचा कार्यकाल संपत असल्याने २०२६ ते २०२८ या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

या बैठकीत संदीप कदम यांनी महाराष्ट्र शासनात मान्यता असणारी व पाठपुरावा करणारी ही एकमेव संघटना असल्याचे सांगितले. कर्मचारी वेतनवाढ, वेतन आयोग, पदोन्नती, भरती प्रक्रिया, पेन्शन योजना, आश्वासित प्रगती योजना आदी विषयांवर आवाज उठवणारी अशी ही मजबूत संघटना असून जिल्हाधिकारी पातळीवर बैठका घेऊन इतिवृत्त जिल्हा कार्यकारिणीला प्रत्येक महिन्याला सादर करणारी मान्यता प्राप्त संघटना असल्याचे सांगितले. आरोग्य विभागाच्यावतीने संघटनेने वेळोवेळी शासन दरबारी आवाज उठवून पदोन्नती प्रश्न धसास लावला आहे. महेंद्र कदम यांच्या कार्यकाळात २३ जणांचे पदोन्नतीचे विषय यशस्वीरित्या पाठपुरावा करून मार्गी लावण्यात आल्याचेही कदम म्हणाले. दीपक कांबळे यांनी आपल्या २७ वर्षांच्या कारकिर्दीत आंदोलने, सभा, मोर्चा अशा विविध मार्गाने आपण संघटनेमार्फत कर्मचारी वर्गाचे विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबतही वेळोवेळी आवाज उठून लढा दिला असल्याचे स्पष्ट केले. आपल्या जिल्हा महासचिव पदाच्या कारकिर्दीत कोविड योद्धा म्हणून आशा कर्मचारी आरोग्यसेविका, आरोग्यसेवक, आरोग्य सहाय्यक यांना कोरोना योद्धा म्हणून शासनातर्फे सन्मान देण्यासाठी प्रश्न मार्गी लावल्याचे ते म्हणाले. संघटनेचे महासचिव संतोष बनसोडे, महेंद्र कदम, आर. डी. चेंदवणकर, शंकर कदम, नागरे, सखाराम गुरखे, महादेव कोकरे, सोनाली तांबे आदी उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!