🛑ज्येष्ठ नागरिकांचे हक्क, अधिकाराबाबत माहिती.
*🛑ज्येष्ठ नागरिकांचे हक्क, अधिकाराबाबत माहिती.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्ग, दि- १८:-* विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तिरवडे ग्रामपंचायत, मालवण येथे ‘ज्येष्ठ नागरिकांचे हक्क व अधिकार’ या विषयावरील जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमास पॅनल विधीज्ञ अॅड. रुपेश परुळेकर,सरपंच रेश्मा गावडे,उपसरपंच सुशील गावडे, मालवण पंचायत समिती सदस्य संतोष गावडे,पोलीस पाटील संतोष जामसंडेकर तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक आणि अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अॅड. रुपेश परुळेकर यांनी ज्येष्ठ नागरिकांचे कायदेशीर हक्क, कल्याण, संरक्षण, प्रतिष्ठा आणि ‘न्याय मिळविण्याच्या अधिकारांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. वृद्धापकाळात अनेक ज्येष्ठ नागरिकांना कौटुंबिक दुर्लक्ष, आर्थिक असुरक्षितता तसेच मानसिक त्रासाला सामोरे जावे
लागते. अशा परिस्थितीत त्यांना कायदेशीर संरक्षण मिळावे, यासाठी ज्येष्ठ नागरिक कायदा, २००७अस्तित्वात असल्याचे त्यांनी सांगितले, मुलांनी आपल्या वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करण्यास नकार दिल्यास संबंधित ज्येष्ठ नागरिकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करावा. दाखल झालेला अर्ज ९० दिवसांच्या आत निकाली काढला जातो तसेच त्यांच्या मुलांना नोटीस काढून मुलांच्या उत्पन्नाची मर्यादा बघून जास्तीत जास्त १० हजार रुपये मासिक निर्वाहभत्ता देण्याची तरतूद कायद्यात असल्याची माहिती त्यांनी दिली.
एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला अपत्य नसल्यास त्यांच्या संपत्तीचा वारसा मिळणाऱ्या व्यक्तीवर त्यांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी येते. अशा व्यक्तीकडूनही ज्येष्ठ नागरिकांना निर्वाहभत्ता मागण्याचा कायदेशीर अधिकार असल्याचे अॅड. परुळेकर यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाद्वारे उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या हक्कांबाबत माहिती मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

