कोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑आंबोलीची कचरा कुंडी करण्यासाठी नेमकं जबाबदार कोण?* *🛑आंबोली ग्रामस्थ, शासकीय यंत्रणा, स्थानिक प्रशासन उदासीन लोकप्रतिनिधी.?*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*

*🎴सावंतवाडी, दि१७- :-*

आंबोली बेळगाव मार्गानजीक नांगरतास धबधब्याच्या पुढे मोठ्या प्रमाणात कचरा टाकून जाळण्यात आलेला आहे. काचेच्या बाटल्या, फरशीचे तुकडे, लोखंडी सामान त्याच ठिकाणी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आहे. निसर्गरम्य आंबोली पाहण्यासाठी पुढील महिन्यात लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देणार आहेत, पर्यायाने आंबोलीतील हॉटेल व्यवसायिक आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या इतर व्यवसायिकांना रोजगार मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे. मात्र ज्या निसर्गावर आंबोलीतील व्यावसायिकांचे पोट भरते ज्या निसर्गामुळेच आंबोलीला जागतिक स्तरावर ओळख मिळाली तो निसर्गच नष्ट करण्याची सुरुवात होत असून या घटनांना वेळीच आवर न घातल्यास आंबोलीच्या निसर्गाची कचरा कुंडी होण्यास फार वेळ लागणार नाही. सध्या आंबोली घाटात ठिकठिकाणी बाहेरील कचरा आणून टाकला जातो यावर कोणाचेही नियंत्रण नाही आंबोली घाटारस्त्याच्या दोन्ही बाजूला वनविभागाची जमीन असल्याने याची जबाबदारी वनविभागाची आहे. मात्र येथील अधिकारी केवळ आपला तीन वर्षाचा कार्यकाल भरण्यासाठी आणि आंबोलीची थंडा हवा खाण्यासाठी आणि विविध योजनांद्वारे येणाऱ्या शासकीय निधीची लय लूट करण्यासाठीच येतात का? असा प्रश्न हा कचरा बघून निर्माण होतो . ज्याप्रमाणे नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी आंबोलीतील युवकांना प्रशिक्षण दिले गेले त्याच प्रकारे स्थानिकांना प्रशिक्षण देऊन कचरा निर्मूलनासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.अशा उपाययोजना न केल्यास अशा प्रकारे बाहेरील व्यक्ती कडून कचरा टाकण्याचे प्रकार नेहमीच सुरू राहतील. आंबोली येथे पोलीस चेक पोस्ट आहे, वनविभागाचे चेक पोस्ट आहे वनविभागाकडे रात्रीची गस्त घालण्यासाठी वाहने आहेत, ट्रॅप कॅमेरे आहेत, स्थानिक वन समिती आहे एवढ्या सगळ्या शासकीय यंत्रणा असून देखील बाहेरील व्यक्ती जर आंबोली मध्ये कचरा टाकत असतील तर या शासकीय यंत्रणांचीच या व्यक्तींना फुस आहे का ? असा प्रश्न निर्माण होतो. त्याचबरोबर येथील निसर्गाचे महत्त्व, मानवी हस्तक्षेपाचे निसर्गा वर होणारे विपरीत परिणाम. प्लास्टिक मुक्त आंबोली करण्यासाठी आंबोलीतील सर्व नागरिकांची जन जागृती करणे. प्रत्येक वाडीवर उपाययोजना करणे देखील गरजेचे आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–

_*🥭🥭🥭कोकणातील शेतकऱ्यांचा आता फवारणीचा खर्च होईल भरपूर कमी….🥭🥭🥭*_

*🏝️ प्रत्येक फवारणी सोबत स्टिकर च्या ऐवजी आता वापरा ॲग्री ८२..🏘️*

*1. ऍक्टिव्हेटर : औषधाची क्रियाशीलता, कार्यक्षमता वाढविण्यासाठी मदत होते.*

*2. स्प्रेडर : औषध पानांवरती पसरवण्यासाठी, आणि औषध आत मध्ये पोचवण्यासाठी मदत होते.*

*3. ओलावा : जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी मदत होते.*

*4. औषधे पाण्यामध्ये सर्वत्र एकसमान मिसळण्यासाठी मदत होते.*

*5. P.H- ज्या जमिनी आमलधर्मी आहेत किंवा ज्या जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण जास्त आहे अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये प्रभावीपणे वापर करू शकतो.*

*कसे वापरावे ?*

*एग्री ८२- शेती उत्पादनामध्ये वापरल्या जाणाऱ्या सगळ्या औषधांसोबत वापरता येते.*

*उदा :1. किटकनाशक, बुरशीनाशक, पाण्यात विरघळणारी खते, किंवा वेस्टिज चे एग्री प्रोडक्ट यांच्यासोबत वापरण्यासाठी: ५-१० मिली प्रति १५ लिटर पाण्यामध्ये.*
*2. तन नाशक सोबत वापरण्यासाठी १५-२० मिली १५ लिटर पाण्यामध्ये.*

*3. खतांसोबत वापरण्यासाठी: ३-४ मिली (प्रति किलो).*

*4. पाण्यासोबत वापरण्यासाठी १६० २०० मिली (प्रति १ एकर साठी).*

*संपर्कासाठी*
*9423254613*

*⭕इतर सुविधा ⭕*
*१)माती परीक्षण करून त्यानुसार खतांचे नियोजन करून मिळेल.*
*२)ॲग्री ८२ वापरल्यानंतर इतर रोगराई साठी तज्ञ व्यक्तींकडून साठी मोफत समुपदेशन मिळेल.*

*माती परीक्षण बुकींगसाठी संपर्क:-*९४२३८७८८८७*
*व्हाट्सअप करा-9423878887*
*9423254613*

—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!