🛑मत्स्यव्यवसाय, बंदर विकासच्या कामांना वेग देण्यावर भर, नीतेश राणेंची आढावा बैठक.
*🛑मत्स्यव्यवसाय, बंदर विकासच्या कामांना वेग देण्यावर भर, नीतेश राणेंची आढावा बैठक.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- १७:-* राज्यातील मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाशी संबंधित विविध प्रकल्प, धोरणे आणि पायाभूत सुविधांच्या कामांचा आढावा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात आयोजित बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीत शिवनीबांध मत्स्यबीज केंद्र भाडेपट्टीने देण्याचा प्रस्ताव, मोर्शी (जि.अमरावती) येथील मत्स्यव्यवसाय व जलशेती पायाभूत सुविधा विकास निधी अंतर्गत प्रस्तावित प्रकल्प, उजनी धरणात मत्स्यबीज सोडण्यासाठी प्लुटस सर्व्हिसेस या ठेकेदारास मुदतवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव तसेच शासकीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र, धोम (ता. वाई, जि. सातारा) हे व्हीआरपी फिशरी प्रायव्हेट लिमिटेड यांना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
तसेच ‘शाश्वत विकास ध्येये” अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाशी संबंधित निर्देशकांमध्ये सुधारणा करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना, ससून डॉक सामंजस्य करारानंतरची कार्यवाही, मरोळ मच्छिमार मार्केट विकासाचा प्रगती अहवाल तसेच मच्छिमार महिलांसाठी हँडग्लोज व गमबूट उपलब्ध करून देण्याबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीचाही आढावा घेण्यात आला. यावेळी महाराष्ट्र सागरी मंडळ (जाहिरातींच्या प्रदर्शनाचे विनियमन) विनियम, २०२६ तसेच स्टॉल व जमीन भाडेपट्ट्याने देण्यासंबंधीच्या विनियमांनुसार करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती सादर करण्यात आली. मुंबई वॉटर मेट्रोसाठी पीएमसी नियुक्तीची सद्यस्थिती, वर्सोवा जेट्टीच्या धर्तीवर मुंबई महानगर प्रदेशातील इतर प्रवासी जेट्टींवरील सुविधा सुधारणा, विजयदुर्ग व जयगड येथे प्रस्तावित शिपयार्ड प्रकल्प, मुंबई महानगर प्रदेशातील प्रवासी जलवाहतुकीसाठी ऑनलाइन तिकीट वितरण प्रणाली तसेच ‘लैंड मॅनेजमेंट अँड वॉटरफ्रंट यूज पॉलिसी” याबाबतही सविस्तर चर्चा झाली.
श्री. राणे यांनी सर्व विषयांचा सविस्तर आढावा घेत कामांची सद्यस्थिती तपासली. प्रलंबित कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही गतीने करण्यात यावी, तसेच विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीला अधिक वेग देण्यात यावा, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या बैठकीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, महाराष्ट्र मत्स्योद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

