🛑आजगाव मायनिंग प्रकरण तापले! ‘दलाल आंदोलनात शिरू शकतात’; मनसेचा गंभीर इशारा
*🛑आजगाव मायनिंग प्रकरण तापले! ‘दलाल आंदोलनात शिरू शकतात’; मनसेचा गंभीर इशारा*
*🛑”गावात नौटंकी नको, सत्ता वापरून प्रकल्प रद्द करा” – जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १७:-* आजगाव, धाकोरे, मातोंडसह परिसरात प्रस्तावित जेएसडब्ल्यू मायनिंग प्रकल्पाविरोधातील संघर्ष अधिक तीव्र होत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ग्रामस्थांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. मात्र, या आंदोलनात “दलाली करणारी मंडळीच घुसखोरी करू शकतात” असा गंभीर इशारा देत मनसेने ग्रामस्थांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आजगाव परिसरात मायनिंगसाठी ड्रोन सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात अधिकृत ठराव मंजूर करण्यात आला होता. ही बाब अत्यंत गंभीर असून त्या वेळी जिल्हा परिषद शिवसेना-भाजप युतीच्या ताब्यात असताना त्यांच्या सदस्यांनी विरोध का केला नाही, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
राज्यात आणि केंद्रात सत्तेवर असलेल्या पक्षांच्या नेत्यांना कोणता प्रकल्प कुठे येणार आहे याची पूर्ण माहिती असते. मात्र, जनतेसमोर अनभिज्ञ असल्याचे दाखवले जाते. प्रकल्प येण्यापूर्वीच सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या मंडळींकडून परिसरातील जमिनींची खरेदी सुरू होते, असा आरोपही त्यांनी केला. आजगाव परिसरातही असाच प्रकार झाल्याचा दावा त्यांनी केला.
“गावात जाऊन आंदोलनाला पाठिंबा देण्याच्या नौटंकीपेक्षा सत्तेचा वापर करून हा प्रदूषणकारी प्रकल्प रद्द करण्याची हिंमत सत्ताधाऱ्यांनी दाखवावी,” असा घणाघाती टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, कळणे मायनिंगविरोधी आंदोलनाचे उदाहरण देत केसरकर यांनी ग्रामस्थांना सावध राहण्याचा सल्ला दिला. “कळणे येथे आंदोलन स्थानिकांच्या हातातून निसटले होते. आजगावमध्ये तशी परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका. आंदोलनाचे नेतृत्व आणि निर्णय प्रक्रिया पूर्णपणे स्थानिक ग्रामस्थांच्याच हातात राहिली पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या मायनिंगविरोधी लढ्यात मनसे पूर्ण ताकदीनिशी ग्रामस्थांच्या पाठीशी उभी असून पक्षाचे वरिष्ठ नेते लवकरच आंदोलकांची भेट घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
आजगाव परिसरातील मायनिंगच्या हालचालींमुळे आधीच संतप्त असलेल्या ग्रामस्थांमध्ये मनसेच्या या भूमिकेमुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

