◾ सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सोनू सावंत यांचे निधन
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि-११:- सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूल सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सोनू अनंत सावंत (७६) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने गुरुवारी साडेनऊच्या सुमारास निधन झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांचे निधन झाले. संस्थाध्यक्ष विकास सावंत आणि पदाधिकारी यांनी रुग्णालयात धाव घेतली. दोडामार्ग हायस्कूलच्या निवृत्त मुख्याध्यापिका सोनाली सावंत यांचे ते पती होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली आहेत.

