कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑शिकवणीशिवाय ८७ टक्के गुणांची झेप;आर्या परबचा सकल मराठा समाजाकडून गौरव

*🛑शिकवणीशिवाय ८७ टक्के गुणांची झेप;आर्या परबचा सकल मराठा समाजाकडून गौरव*

 

*🛑शेतकरी कुटुंबातील विद्यार्थिनीने मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर घडवला यशाचा आदर्श.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १६:-* दहावीच्या शालेय परीक्षेत कोणत्याही खासगी शिकवणीचा आधार न घेता केवळ स्वअभ्यास, नियमित गृहपाठ आणि अथक मेहनतीच्या जोरावर ८७ टक्के गुण मिळविणाऱ्या कु. आर्या रणजीत परब हिचा सकल मराठा समाज सिंधुदुर्गच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. नगराध्यक्ष सौ. श्रद्धाराजे भोसले यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.

आर्या परब ही शेतकरी कुटुंबातील विद्यार्थिनी असून तिचे वडील रणजीत परब हे भाजीपाला व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर आर्याने हे उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिचे यश मराठा समाजातील तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष सिताराम गावडे यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना नगराध्यक्ष सौ. श्रद्धाराजे भोसले म्हणाल्या, “मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर कोणतीही गोष्ट साध्य करता येते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आर्या परब होय. तिच्या यशातून मराठा समाजातील मुला-मुलींनी प्रेरणा घ्यावी आणि आपल्या ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न करावेत.”

या गौरव सोहळ्याला आर्याचे वडील रणजीत परब हेही उपस्थित होते. मुलीच्या यशाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी आर्या परब हिचे अभिनंदन करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

आर्याच्या या यशाने केवळ तिच्या कुटुंबाचाच नव्हे, तर संपूर्ण समाजाचा अभिमान वाढवला असून मेहनत, आत्मविश्वास आणि जिद्द यांच्या बळावर यशाचे शिखर गाठता येते, हा संदेश तिच्या यशोगाथेतून अधोरेखित झाला आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!