🛑पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून आदिवासी बांधवांचे घराचे स्वप्न साकार.
*🛑पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून आदिवासी बांधवांचे घराचे स्वप्न साकार.*
*🛑करंजे येथे प्रधानमंत्री जनमन आवास योजनेतील घरकुलांचा गृहप्रवेश सोहळा उत्साहात;विकासाच्या मुख्य प्रवाहात वंचित घटकांना आणण्याचा निर्धार.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्ग, दि- १५:-* सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करंजे गावात प्रधानमंत्री जनमन आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या आदिवासी बांधवांच्या घरकुलांचा गृहप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. राज्यातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार कटिबद्ध असून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्याचे कार्य प्राधान्याने सुरू असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी सांगितले.
प्रधानमंत्री जनमन आवास योजनेअंतर्गत ग्रामपंचायत करंजे येथे चार घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती. विशेष म्हणजे सर्व चारही घरकुले निर्धारित कालावधीत पूर्ण झाली असून आदिवासी कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार झाले आहे.
या योजनेतील लाभार्थी भूमिहीन असल्याने त्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत घरकुलासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्यात आली. गावातील श्रीमती वैजयंती मौर्य, शिवाजी वाळके, विठ्ठल वाळके, श्रीमती निर्मला परब आणि श्रीमती मयुरी शिरसाठ यांनी बक्षीसपत्राद्वारे एकूण ४ आर क्षेत्र उपलब्ध करून दिले. या जमिनीच्या खरेदीसाठी शासनाकडून प्रति लाभार्थी ३१ हजार ३०५ रुपये प्रमाणे एकूण १ लाख २५ हजार २२० रुपयांचे अनुदान देण्यात आले.
तसेच प्रधानमंत्री जनमन आवास योजनेअंतर्गत प्रत्येक घरकुलासाठी २ लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले. याशिवाय महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरीपोटी एकूण १ लाख ४ हजार ५२० रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली या वसाहतीत सोलर पंपाद्वारे पाणीपुरवठा, वीज सुविधा तसेच इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे केवळ घरकुलच नव्हे तर सर्व सुविधांनी युक्त असे सुसज्ज जीवनमान लाभार्थ्यांना मिळाले आहे.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, सभापती हर्षदा वाळके, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, उपसभापती राजेश सावंत, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, सरपंच श्रीमती मेस्त्री, ग्रामसेवक ऋतुराज कदम तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
करंजे येथील हा गृहप्रवेश सोहळा केवळ घरांच्या चाव्या वाटण्यापुरता मर्यादित नसून, आदिवासी बांधवांना सन्मानाने जगण्याचा अधिकार देणाऱ्या शासनाच्या लोककल्याणकारी धोरणांचा आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाचा प्रत्यय देणारा ठरला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

