🛑राजापूर तालुक्यातील पन्हाळे येथे हायवे लगत जुगार अड्डा?पोलिसांच्या डोळ्यावर गांधारीची पट्टी; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
*🛑राजापूर तालुक्यातील पन्हाळे येथे हायवे लगत जुगार अड्डा?पोलिसांच्या डोळ्यावर गांधारीची पट्टी; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह*
*🛑रात्रभर लाखोंची उलाढाल, हप्तेखोरीचे आरोप; एसपी कारवाई करणार का?*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴राजापूर, दि- १५:-* राजापूर तालुक्यातील पन्हाळे गावात हायवे लगत असलेल्या हॉटेल परिसरात रात्री उशिरापर्यंत कथितपणे मोठ्या प्रमाणात जुगाराचा अड्डा सुरू असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. स्थानिक स्तरावर मिळालेल्या माहितीनुसार, रात्री १२ वाजल्यापासून सकाळी ७ वाजेपर्यंत येथे लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचे आरोप करण्यात येत आहेत.
संबंधित ठिकाणी दररोज ५ ते १० लाख रुपयांपर्यंत व्यवहार होत असल्याचा दावा काही नागरिकांनी केला आहे. तसेच या कथित जुगार व्यवसायातून विविध स्तरांवर हप्ते दिले जात असल्याचेही गंभीर आरोप समोर येत आहेत. मात्र या आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
विशेष म्हणजे, जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना दिल्यानंतरही तत्काळ कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. काही तक्रारदारांचे म्हणणे आहे की, पोलिसांकडे माहिती पोहोचताच संबंधितांना पूर्वसूचना मिळते आणि काही काळासाठी हालचाली थांबवल्या जातात. त्यानंतर पुन्हा पूर्ववत व्यवहार सुरू होत असल्याची चर्चा आहे.
या सर्व प्रकरणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. “आमचे कोणी काहीही बिघडवू शकत नाही” अशा प्रकारची भाषा कथित अड्डा चालकांकडून वापरली जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
*पोलीस अधीक्षकांचे लक्ष वेधले जाणार*
या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी होत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या आरोपांची दखल घेऊन विशेष पथकामार्फत अचानक छापा टाकावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
*कारवाई न झाल्यास गृहमंत्री आणि केंद्रीय गृह मंत्र्यांकडे धाव*
दरम्यान, या कथित जुगार अड्ड्यावर तातडीने कारवाई न झाल्यास राज्याचे गृह मंत्री तसेच केंद्रीय गृह मंत्री यांच्याकडे लेखी तक्रार पाठविण्यात येणार असल्याचे तक्रारदारांनी सांगितले आहे.
आता या गंभीर आरोपांनंतर राजापूर पोलिस आणि जिल्हा पोलीस प्रशासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
टीप : वरील वृत्तातील आरोप हे स्थानिकांकडून करण्यात आलेल्या दाव्यांवर आधारित असून संबंधित यंत्रणांची अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. अधिकृत बाजू प्राप्त झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

