कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑धाकोरे ग्रामपंचायततीचा ‘एक दाखला,एक वृक्ष’ स्तुत्य उपक्रम.

*🛑धाकोरे ग्रामपंचायततीचा ‘एक दाखला,एक वृक्ष’ स्तुत्य उपक्रम.*

 

*🛑धाकोरे ग्रामपंचायतीचा डिजिटल आणि पर्यावरणपूरक उपक्रम.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- १५:-* फक्त शासकीय दाखले देणे हाच उद्देश न ठेवता, गावातील प्रत्येक घरात पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहचावा या मुख्य हेतूने धाकोरे ग्रामपंचायतीने निसर्गाच्या दृष्टीने एक चांगला निर्णय घेत सामाजिक दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

गावात ‘एक दाखला, एक वृक्ष’ या अभिनव नियमाची अंमलबजावणी अत्यंत उत्साहात सुरू करण्यात आली. आता ग्रामस्थांना कोणताही शासकीय दाखला हवा असल्यास आधी एक झाड लावावे लागणार आहे.

या उपक्रमामुळे प्रत्येक दाखल्यासोबत गावामध्ये एक नवे झाड लावले जाईल.त्याचप्रमाणे

दाखल्यांची प्रक्रिया डिजिटल करून गावाचा कारभार गतिमान केला आहे.

धाकोरे ग्रामपंचायत वतीने राबविण्यात येत असलेल्या शासकीय कामांना थेट निसर्ग संवर्धनाशी जोडणारा हा पहिलाच स्तुत्य उपक्रम आहे.

‘एक दाखला, एक वृक्ष’ या अभिनव नियमाची अंमलबजावणी अत्यंत उत्साहात सुरू झाली असून,

आता ग्रामस्थांना कोणताही शासकीय दाखला हवा असल्यास आधी पर्यावरणाची सेवा करावी लागणार आहे.

धाकोरे ग्रामपंचायतीकडून नवीन विवाह नोंदणी, कामगार दाखला, वारस दाखला किंवा नाहरकत प्रमाणपत्र (NOC) हवे असल्यास अर्जदाराला खालील दोन गोष्टींपैकी एक अट पूर्ण करावी लागणार आहे.

एक झाड लावून त्याचा ‘वृक्ष सेल्फी’ ग्रामपंचायतीला दाखवणे बंधनकारक असून गावात जलसंधारण वाढवण्यासाठी ‘शोषखड्डा खणल्याचा किंवा जुना शोषखड्डा दुरुस्त केल्याचा सेल्फी’ सादर करणे गरजेचे आहे.

हा स्तुत्य उपक्रम गावात सुरू झाला असून या उपक्रमाचे ‘पहिले मानकरी’ ठरले आहेत , ऋषिकेश आणि दीपक.

या अभिनव नियमाची सुरुवात अत्यंत सकारात्मकतेने झाली आहे.गावातील दोन ग्रामस्थांनी या मोहिमेत पहिले योगदान दिले असून यात

ऋषिकेश संतोष दळवी यांनी आपल्या लग्नाचा दाखला (विवाह नोंद) मिळण्यापूर्वी नियमाचे काटेकोर पालन केले. त्यांनी सुंदर वृक्षारोपण करून आपली ‘पर्यावरण सेल्फी’ सादर केली आणि आपला दाखला प्राप्त केला.

तसेच दीपक अनंत गोवेकर यांनीही एक जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्य चोख बजावले. त्यांनी झाड लावल्याची सेल्फी दाखवून आपला ‘कामगार दाखला’ मिळवला.

“केवळ दाखले देणे ग्रामपंचायतचा उद्देश नसून, या उपक्रमांद्वारे गावातील प्रत्येक घरातून पर्यावरणाचा सुसंवाद घडावा, हा यामागील शुद्ध हेतू आहे. यावेळी ऋषिकेश आणि दीपक यांचे खास अभिनंदन करण्यात आले.

धाकोरे ग्रामपंचायतीच्या या डिजिटल आणि पर्यावरणपूरक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. हा उपक्रम गावाचा विकास हिरवाईने नटवण्यासाठी आणि पाण्याचे दुर्भिक्ष कमी करण्यासाठी मैलाचा दगड ठरेल यात शंका नाही.

धाकोरे ग्रामपंचायतीच्या या आगळ्यावेगळ्या डिजिटल आणि पर्यावरणपूरक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, इतर गावांसमोर त्यांनी एक नवा आदर्श ठेवला आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!