कोल्हापुरच्या मद्यधुंद तरुणाला बेदम चोप…
🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली : दि. ११ पटवर्धन चौकात कणकवली शहरातील एका स्थानिकाच्या अंगावर गेलेल्या कोल्हापूरच्या मद्यधुंद तरुणाला बेदम चोप देण्यात आला. गुरुवारी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
या घटनेनंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत कोल्हापूरच्या त्या तिघांना पोलिस स्टेशनला नेले. कोल्हापूरचे ते तिघे युवक आपली चारचाकी घेऊन कणकवलीत आले होते. पटवर्धन चौकात एका बाजूला आपली गाडी उभी करत फोन वर बोलत असलेल्या एका स्थानिक तरुणाला गाडी बाजूला घेण्यासाठी कोल्हापूरच्या त्या कार चालकाने हॉर्न वाजवला. या दरम्यान स्थानिक युवकाने फोनवर बोलत असल्याने फोनवर बोलतोय असे सांगत, तुम्ही बाजूने गाडी न्या असे सांगताच. त्या कोल्हापूरच्या एका तरुणाने गाडीतून खाली उतरून स्थानिकाच्या अंगावर जात धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी स्थानिकाने त्या कोल्हापूरच्या तरुणाला बेदम चोप दिला. यामुळे पटवर्धन चौकात कणकवली शहरातील अनेकांनी गर्दी केली. अखेर कोल्हापूरच्या त्या तिघांनी माफीनामा सादर केला. मात्र पोलिसांनी त्यांना पोलीस स्टेशनला नेले.
🔥चुलीत भाजलेल्या काजु bbगरांची चवच न्यारी!🔥
💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..
🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..
💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..
⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!
🤷🏻♂️आजच संपर्क करा ⬇️
🥏9405184052 🪀
🥏9421544545 🪀
📤..फोन न लागल्यास मेसेज करा!
🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

