🛑 आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट ॲक्शन मोडमध्ये!
🛑 सावंतवाडी मतदारसंघ प्रमुखपदी रुपेश राऊळ यांची फेरनिवड ; कणकवलीची धुरा सुशांत नाईक यांच्या खांद्यावर
🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL
✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-१२:- आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करत पक्षबांधणीला वेग देण्यास सुरुवात केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुखपदी रुपेश राऊळ यांची पुन्हा फेरनिवड केली असून, युवासेनेचे आक्रमक नेते सुशांत नाईक यांच्यावर कणकवली विधानसभा मतदारसंघ प्रमुखपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. याबाबतची घोषणा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामना मधून करण्यात आली आहे.
सिंधुदुर्गातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार व जिल्हाप्रमुख वैभव नाईक आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी कार्यरत व्हावे, अशा सूचनाही पक्षश्रेष्ठींनी दिल्या आहेत.
मागील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये सावंतवाडी मतदारसंघात सत्ताधाऱ्यांच्या धनशक्तीविरोधात जोरदार लढा उभारण्यात रुपेश राऊळ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. थेट नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार जाहीर करणे, विविध निवडणुकांमध्ये सक्षम उमेदवार रिंगणात उतरवणे आणि कोणतीही जागा बिनविरोध होऊ न देणे, या त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत त्यांच्यावर पुन्हा एकदा सावंतवाडी मतदारसंघाची धुरा सोपवण्यात आली आहे.
दुसरीकडे, युवासेनेच्या माध्यमातून कणकवली मतदारसंघात स्थानिक प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेणारे सुशांत नाईक यांना पक्षाने मोठी संधी दिली आहे. वेळोवेळी पालकमंत्री आणि खासदारांवर थेट टीका करत त्यांनी शिवसेनेची भूमिका प्रभावीपणे मांडली होती. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना युवासेनेकडून मुख्य शिवसेनेत आणून कणकवली विधानसभा मतदारसंघ प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
या नव्या नियुक्त्यांमुळे सिंधुदुर्गातील ठाकरे गटाची संघटनात्मक ताकद वाढणार असून, आगामी निवडणुकांमध्ये सावंतवाडी आणि कणकवली या दोन्ही मतदारसंघांमध्ये राजकीय चुरस अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
*………सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🥭🥭🥭कोकणातील शेतकऱ्यांचा आता फवारणीचा खर्च होईल भरपूर कमी….🥭🥭🥭*_
*🏝️ प्रत्येक फवारणी सोबत स्टिकर च्या ऐवजी आता वापरा ॲग्री ८२..🏘️*
*1. ऍक्टिव्हेटर : औषधाची क्रियाशीलता, कार्यक्षमता वाढविण्यासाठी मदत होते.*
*2. स्प्रेडर : औषध पानांवरती पसरवण्यासाठी, आणि औषध आत मध्ये पोचवण्यासाठी मदत होते.*
*3. ओलावा : जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी मदत होते.*
*4. औषधे पाण्यामध्ये सर्वत्र एकसमान मिसळण्यासाठी मदत होते.*
*5. P.H- ज्या जमिनी आमलधर्मी आहेत किंवा ज्या जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण जास्त आहे अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये प्रभावीपणे वापर करू शकतो.*
*कसे वापरावे ?*
*एग्री ८२- शेती उत्पादनामध्ये वापरल्या जाणाऱ्या सगळ्या औषधांसोबत वापरता येते.*
*उदा :1. किटकनाशक, बुरशीनाशक, पाण्यात विरघळणारी खते, किंवा वेस्टिज चे एग्री प्रोडक्ट यांच्यासोबत वापरण्यासाठी: ५-१० मिली प्रति १५ लिटर पाण्यामध्ये.*
*2. तन नाशक सोबत वापरण्यासाठी १५-२० मिली १५ लिटर पाण्यामध्ये.*
*3. खतांसोबत वापरण्यासाठी: ३-४ मिली (प्रति किलो).*
*4. पाण्यासोबत वापरण्यासाठी १६० २०० मिली (प्रति १ एकर साठी).*
*संपर्कासाठी*
*9423254613*
*⭕इतर सुविधा ⭕*
*१)माती परीक्षण करून त्यानुसार खतांचे नियोजन करून मिळेल.*
*२)ॲग्री ८२ वापरल्यानंतर इतर रोगराई साठी तज्ञ व्यक्तींकडून साठी मोफत समुपदेशन मिळेल.*
*माती परीक्षण बुकींगसाठी संपर्क:-*९४२३८७८८८७*
*व्हाट्सअप करा-9423878887*
*9423254613*
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

