कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत सिंधुदुर्गचा दबदबा!

*🛑राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत सिंधुदुर्गचा दबदबा!*

 

*🛑युक्ता सावंत राज्यात अव्वल; गौरव आजगावकरची दुहेरी कांस्यपदकांची कमाई.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १२:-* मुंबई येथील वरळी येथे पार पडलेल्या 29 व्या कॅप्टन एस.जे. इजीकल मेमोरियल महाराष्ट्र राज्य नेमबाजी स्पर्धेत सिंधुदुर्गच्या नेमबाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्याचा झेंडा राज्यभरात फडकावला. उपरकर शूटिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी विविध गटांमध्ये पदके पटकावत आपली गुणवत्ता सिद्ध केली.

50 मीटर .22 पीप साईट प्रोन प्रकारात वेंगुर्ल्याच्या गौरव दत्तप्रसाद आजगावकर याने 600 पैकी 561 गुणांची कमाई करत युथ व ज्युनिअर गटात प्रत्येकी एक अशी दोन कांस्यपदके जिंकली. खुल्या गटातही त्याने चौथा क्रमांक पटकावला. तर कणकवलीच्या विशाल पोळ याने 570 गुणांसह कांस्यपदक मिळविले. रौप्यपदक केवळ दोन गुणांनी हुकल्याने त्याची कामगिरी विशेष ठरली.

*युक्ता सावंतचा अचूक निशाणा; राज्यात प्रथम क्रमांक*

50 मीटर .22 प्रोन ओपन साईट प्रकारात युक्ता प्रमोद सावंत हिने महिला आणि पुरुष अशा दोन्ही गटांतील सर्वोच्च गुणांची नोंद करत प्रथम क्रमांकावर कब्जा केला. तिची निवड पंजाब येथे होणाऱ्या ऑल इंडिया जी. व्ही. मावळणकर नेमबाजी स्पर्धेसाठी झाली आहे. याच प्रकारात योगेश पारकर याने तृतीय तर स्वप्नील शिर्के याने चौथा क्रमांक मिळविला.

*अनेक खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेकडे वाटचाल*

प्रतीक बोवलेकर, कांचन उपरकर, चेतन चव्हाण यांच्यासह अनेक नेमबाजांची पूर्व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच शुभ्रव शिर्के, कुणाल गौडळकर, प्रशांत सावंत, सौरव गावडे आणि शैलेश सावंत यांनीही उत्कृष्ट कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

*उपरकर शूटिंग अकॅडमीचे यश*

या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक कांचन उपरकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच रत्नागिरीचे प्रशिक्षक पुष्कराज इंगोले आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक ॲड. विक्रम भांगले यांचेही बहुमोल मार्गदर्शन मिळाले. निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशन आणि विविध मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोकणचा निशाणा अचूक; राज्यभर सिंधुदुर्गच्या नेमबाजांची दखल!

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!