🛑उच्च न्यायालयाच्या आदेशाला हरताळ? सावंतवाडी-दोडामार्गमध्ये बेसुमार वृक्षतोडीचा गंभीर आरोप.
*🛑उच्च न्यायालयाच्या आदेशाला हरताळ? सावंतवाडी-दोडामार्गमध्ये बेसुमार वृक्षतोडीचा गंभीर आरोप.*
*🛑पर्यावरण कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार; हजारो वृक्षांची कत्तल झाल्याचा दावा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- १२:-* माननीय उच्च न्यायालयाने वृक्षतोडीवर बंदी घालून स्पष्ट आदेश दिलेले असतानाही सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असल्याचा गंभीर आरोप सामाजिक व पर्यावरण कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून तातडीने चौकशी व कठोर कारवाईची मागणी केली आहे.
*उच्च न्यायालयाच्या आदेशालाच आव्हान?*
संपूर्ण दोडामार्ग तालुका तसेच सावंतवाडी तालुक्यातील १३ गावांमध्ये वृक्षतोड बंदीचे आदेश लागू असताना सासोली, पाट्ये, मोर्ले, सरमळे, कोलझर आणि फुकेरी या गावांमध्ये गेल्या वर्षभरात हजारो वृक्षांची तोड झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशांचा उघडपणे अवमान होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
टास्क फोर्स समिती नेमली, मग वृक्षतोड थांबली का नाही?
वृक्षतोड रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष टास्क फोर्स समिती स्थापन करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, अशा समितीच्या अस्तित्वातही मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असेल तर संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची चर्चा पर्यावरणप्रेमींमध्ये सुरू आहे.
वन्यजीवांच्या अधिवासावर घाला
सावंतवाडी-दोडामार्ग परिसर हा वन्यजीवांचा महत्त्वाचा वाइल्ड लाईफ कॉरिडॉर म्हणून ओळखला जातो. वृक्षतोडीमुळे जंगलांचे क्षेत्र कमी होत असून हत्ती, गवे, रानरेडे यांसारखे वन्यप्राणी नागरी वस्त्या, शेती आणि बागायतींकडे वळत आहेत. यापूर्वी अशा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत काही शेतकऱ्यांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत.
*एकीकडे वृक्षारोपण, दुसरीकडे वृक्षसंहार*
शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करून वृक्षारोपण मोहिमा राबवल्या जात असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याचे चित्र समोर येत आहे. “एकीकडे वृक्षारोपण आणि दुसरीकडे वृक्षसंहार” ही परिस्थिती सिंधुदुर्गच्या समृद्ध वनसंपदेसह जैवविविधतेसाठी धोकादायक असल्याचे डॉ. परुळेकर यांनी म्हटले आहे.
*कारवाईची मागणी*
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच वृक्षतोडीमागील नेमके हितसंबंध उघड करावेत, अशी मागणी डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
प्रश्न अनुत्तरितच…
उच्च न्यायालयाचे आदेश अस्तित्वात असताना हजारो वृक्षांची कत्तल नेमकी कोणाच्या आशीर्वादाने झाली? वन विभाग, महसूल विभाग आणि टास्क फोर्स समिती यांना याची माहिती नव्हती का? की सर्व काही माहिती असूनही डोळेझाक करण्यात आली? या प्रश्नांची उत्तरे आता जिल्हा प्रशासनाला द्यावी लागणार आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

