🛑नोकरीचे आमिष दाखवून सव्वादोन लाखांची फसवणूक.
*🛑नोकरीचे आमिष दाखवून सव्वादोन लाखांची फसवणूक.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- ११:-* शासकीय विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून कणकवलीत एका उच्चशिक्षित बेरोजगार तरुणीची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या गोपनीय विभागात नोकरी लावतो, असे खोटे सांगून संशयित आरोपीने या तरुणीकडून २ लाख २४ हजार ६५० रुपये उकळले. पैसे देऊनही नोकरी न मिळाल्याने आणि दिलेले पैसे परत देण्यास नकार दिल्याने अखेर या प्रकरणी तोंडवली येथील श्रीकृष्ण शामसुंदर कुडतरकर याच्याविरुद्ध कणकवली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कणकवली येथे राहणाऱ्या एका पदव्युत्तर (एम.कॉम.) शिक्षण पूर्ण झालेल्या तरुणीला नोकरीची अत्यंत गरज होती. याचाच गैरफायदा घेत संशयित आरोपी श्रीकृष्ण कुडतरकर याने आपण स्वतः ‘अँटी करप्शन’ मध्ये काम करत असल्याची बतावणी केली. तसेच जिल्हाधिकारी मॅडम यांच्या विशेष अधिकारातील गोपनीय विभागात वरिष्ठ लिपिक या पदावर तिला नोकरीस लावून देतो, असे प्रलोभन त्याने तरुणीच्या कुटुंबाला
दाखवले. या कामासाठी एकूण दोन लाख रुपयांची मागणी केली.
पीडित तरुणीच्या कुटुंबाने श्रीकृष्ण याच्या सांगण्यावरून वेगवेगळ्या तारखांना गुगल पे आणि नेट बैंकिंगद्वारे पैशांचे व्यवहार केले. २ ऑक्टोबर २०२५ ते २९ डिसेंबर २०२५ या कालावधीत टप्याटप्प्याने एकूण २ लाख २४ हजार ६५० रुपये कुडतरकर याने दिलेल्या बँक खात्यांवर वर्ग केले.
पैसे देऊनही अनेक महिने नोकरी लागत नसल्याने आणि श्रीकृष्ण कुडतरकर याच्याकडून वेगवेगळ्या सबबी सांगून वारंवार टाळाटाळ केली जात असल्याने तरुणीला व तिच्या कुटुंबाला संशय आला. त्यांनी दिलेल्या पैशांची मागणी लावून धरली असता, त्याने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणी व तिच्या कुटुंबाने कुडतरकर याच्या विरोधौत तक्रार नोंदवली. संबंधित संशयित श्रीकृष्ण कुडतरकर हा अँटी करप्शनमध्ये कोणत्याही पदावर कार्यरत नसून, त्याने केवळ आर्थिक लुबाडणूक करण्यासाठी हा खोटा बनाव रचल्याचें तपासात समोर आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

