🛑भरवस्तीत चेन स्नॅचिंगचा थरार!
*🛑भरवस्तीत चेन स्नॅचिंगचा थरार!*
*🛑सावंतवाडीत दिवसाढवळ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून चोरटे फरार; पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १०:-* सावंतवाडी शहरातील भरवस्तीत आणि गजबजलेल्या कॉसमॉस पॅराडाईज परिसरात आज सकाळी घडलेल्या धाडसी चेन स्नॅचिंगच्या घटनेने शहर हादरले आहे. दिवसाढवळ्या एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून दोन चोरटे दुचाकीवरून फरार झाल्याने शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे*.
आज सकाळी साडेआठच्या सुमारास रंजना पांडुरंग ठाकूर (वय ५९) या त्यांच्या सहकारी महिलेसोबत बिल्डिंगच्या खाली उभ्या असताना एका अज्ञात तरुणाने माहिती विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्याशी संवाद साधला. “शेअर मार्केटचे काम कोण करतात?” अशी चौकशी करत त्याने विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने ठाकूर यांनी त्याला सोसायटीच्या
पदाधिकाऱ्यांकडे जाण्याचा सल्ला दिला.
याच क्षणाची वाट पाहत असलेल्या त्या भामट्याने ठाकूर या पाठमोऱ्या होताच त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन झटक्यात हिसकावली आणि बाहेर तयार असलेल्या साथीदाराच्या दुचाकीवर बसून जेल रोडच्या दिशेने पोबारा केला.
*नागरिकांचा पाठलाग; पण चोरटे पसार*
घटनेनंतर ठाकूर यांनी आरडाओरडा करताच परिसरातील नागरिकांनी तत्परता दाखवत स्वतःच्या दुचाकींवरून चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र, भरधाव वेगाने पळून गेलेल्या चोरट्यांना पकडण्यात यश आले नाही. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
*सीसीटीव्ही बंद, फुटेज अस्पष्ट; सुरक्षा व्यवस्थेची पोलखोल*
घटनेची माहिती मिळताच नगरसेविका नीलम नाईक यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना तत्काळ माहिती दिली. मात्र तपासादरम्यान संभाजी चौकातील सीसीटीव्ही बंद असल्याचे आणि जेल परिसरातील कॅमेऱ्यांचे फुटेज अस्पष्ट असल्याचे समोर आले. त्यामुळे शहरातील सुरक्षाव्यवस्थेची गंभीर पोलखोल झाली आहे.
“शहरातील महत्त्वाच्या ठिकाणचे सीसीटीव्ही कार्यरत नसतील तर गुन्हेगारांना आळा कसा बसणार?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
*पोलिसांचा तपास युद्धपातळीवर*
घटनेनंतर सावंतवाडी पोलिसांनी तातडीने पंचनामा करून विविध भागांतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून संशयितांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
*महिलांमध्ये भीती; चोरटे कधी जेरबंद होणार?*
भरवस्तीत, तेही सकाळच्या वेळेत घडलेल्या या धाडसी चोरीमुळे सावंतवाडीतील महिला वर्गात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. शहरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून पोलिसांनी चोरट्यांना तातडीने जेरबंद करून शहरातील सुरक्षेवरील विश्वास पुन्हा निर्माण करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

