कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडीतील जनतेचा कौल मान्य; एकनिष्ठतेचे धडे देण्याआधी आत्मपरीक्षण करा – साक्षी वंजारी

*🛑सावंतवाडीतील जनतेचा कौल मान्य; एकनिष्ठतेचे धडे देण्याआधी आत्मपरीक्षण करा – साक्षी वंजारी*

 

*🛑धनशक्ती,राजवाडा हेरिटेज दर्जा,श्री देव पाटेकर परिसर आणि काळ्या गॉगलच्या वक्तव्यावरून काँग्रेसचे सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १०:-* सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीत जनतेने दिलेला कौल आम्ही पूर्णपणे मान्य केला असून त्याच जोमाने पुढील राजकीय वाटचालीला सुरुवात केली आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ. साक्षी समीर वंजारी यांनी केले आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात त्यांनी एका नगरसेवकावर नाव न घेता टीका करताना म्हटले आहे की, वेळेनुसार नेते आणि पक्ष बदलणाऱ्या तसेच वैयक्तिक स्वार्थासाठी अनेक पक्षांत वावरणाऱ्या व्यक्तींनी पक्षनिष्ठा आणि एकनिष्ठतेचे धडे देऊ नयेत. पक्षाची परिस्थिती प्रतिकूल झाल्यावर सर्वप्रथम उडी मारणाऱ्यांमध्ये अशा व्यक्तींचा समावेश असतो, असा आरोप त्यांनी केला.

उपनगराध्यक्षपदासाठी ज्येष्ठ असूनही विचार का झाला नाही, याचे आत्मपरीक्षण संबंधित नगरसेवकाने करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. सत्ता नसलेल्या पक्षातून निवडणूक लढविताना धनशक्ती नसल्याने किती मते मिळाली होती, हे जनतेला चांगलेच माहिती असल्याचे त्या म्हणाल्या.

*धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा सवाल*

सौ. वंजारी यांनी निवडणुकीतील धनशक्तीच्या मुद्द्यावरही प्रश्न उपस्थित केला. नगराध्यक्ष व नगरसेवकांनी श्री देव पाटेकर यांच्या साक्षीने आपण सर्वजण केवळ जनशक्तीच्या बळावर निवडून आलो असून कोणतीही धनशक्ती वापरली नाही, असे जाहीर करावे, असे आव्हान त्यांनी दिले. निवडणुकीदरम्यान झालेल्या कथित देवाण-घेवाणीच्या चर्चांचा उल्लेख करत त्यांनी सत्य समोर येईल, असा विश्वास व्यक्त केला.

*श्री देव पाटेकर परिसराबाबत भूमिका स्पष्ट*

श्री देव पाटेकर हे सावंतवाडीकरांचे आराध्य दैवत असून त्यांच्या विषयी सर्वांच्या मनात श्रद्धा असल्याचे सांगत, परिसर स्वच्छ होणे ही स्वागतार्ह बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र शहरात स्वच्छतेची गरज असलेली अनेक ठिकाणे आहेत, हा मुद्दा मांडण्याचा आपला उद्देश होता, असे त्यांनी नमूद केले.

*राजवाडा परिसराला हेरिटेज दर्जा मिळवून द्या*

राजवाडा परिसर हा सावंतवाडीच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचा अविभाज्य भाग असून त्याला हेरिटेज दर्जा मिळवून देण्यासाठी संबंधित नगरसेवकाने पुढाकार घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच नवीन व्यापारी संकुलातील जागावाटपाबाबत काही विशिष्ट व्यक्तींना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे का, असा सवाल उपस्थित करत जनतेसमोर सत्य येईल, असा दावा त्यांनी केला.

काळ्या गॉगलवरूनही टोला

काळ्या गॉगलच्या मुद्द्यावरूनही सौ. वंजारी यांनी खोचक टीका केली. ज्यांचे नेते काळा गॉगल वापरतात, त्यांना खरोखरच दिसत नाही असे म्हणायचे आहे का, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सत्ताधाऱ्यांचा रोष नेमका कोणावर आहे, हे स्पष्ट करावे, असे म्हटले. सत्तेवर येऊन सहा महिने उलटून गेले असूनही जर सत्तेची धुंदी उतरली नसेल तर काळा चष्मा वापरून कदाचित उघड्या डोळ्यांनी न दिसणाऱ्या गोष्टी दिसतील, असा टोला त्यांनी लगावला.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!