🛑मोठे बजेट, वाढती लोकसंख्या; पण प्रशासनाचा कणा अद्याप तात्पुरत्या व्यवस्थेवर!-नगरसेविका सौ निलम नाईक.
*🛑मोठे बजेट, वाढती लोकसंख्या; पण प्रशासनाचा कणा अद्याप तात्पुरत्या व्यवस्थेवर!-नगरसेविका सौ निलम नाईक*
*🛑१४९ वर्षांच्या सावंतवाडी नगरपरिषदेला अजूनही कायम मुख्याधिकारी नाही!*
*🛑 नगरसेविका निलम नाईक यांची पालकमंत्री नितेश राणेंकडे तातडीच्या नियुक्तीची मागणी.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०९:-* जिल्ह्यातील सर्वात जुनी आणि ऐतिहासिक वारसा लाभलेली सावंतवाडी नगरपरिषद आजही कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्याविना कारभार करत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. याबाबत नगरसेविका सौ. निलम परिमल नाईक यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे तातडीने कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्त करण्याची मागणी केली आहे.
सन १८७७ मध्ये स्थापन झालेली सावंतवाडी नगरपरिषद ही तब्बल १४९ वर्षांचा इतिहास लाभलेली संस्था असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात जुनी व प्रतिष्ठित नगरपरिषद म्हणून तिची ओळख आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी नगरपरिषदेचे अंदाजपत्रक सुमारे १४९ कोटी रुपयांचे आहे. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या २३ हजार होती, ती आता अंदाजे ३५ हजारांच्या घरात पोहोचली आहे.
नगरपरिषदेच्या प्रशासनाचा कणा म्हणून मुख्याधिकाऱ्याकडे पाहिले जाते. शहराच्या विकासकामांचे नियोजन, नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, प्रशासकीय निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी आणि विविध योजनांचे व्यवस्थापन यासाठी पूर्णवेळ व कार्यक्षम मुख्याधिकारी असणे अत्यावश्यक असल्याचे नाईक यांनी म्हटले आहे.
सध्या कार्यरत असलेल्या मुख्याधिकाऱ्यांकडे तात्पुरता पदभार असून इतर ठिकाणांचाही अतिरिक्त कार्यभार असल्यामुळे सावंतवाडीसारख्या मोठ्या नगरपरिषदेच्या कामकाजासाठी आवश्यक तो वेळ देणे शक्य होत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. याचा परिणाम प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि नागरिकांच्या दैनंदिन कामांवर होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
“वाढती लोकसंख्या, वाढते बजेट आणि शहराच्या विकासाच्या वाढत्या गरजा लक्षात घेता सावंतवाडी नगरपरिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे प्रशासन अधिक गतिमान होईल आणि नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध होतील,” असे मत नगरसेविका सौ. निलम नाईक यांनी व्यक्त केले.
यासाठी शासनाने तातडीने निर्णय घेऊन सावंतवाडी नगरपरिषदेस कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

