कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑दुकानदार महिलेला बोलण्यात गुंतवून सोन्याची चेन लांबवली.

*🛑दुकानदार महिलेला बोलण्यात गुंतवून सोन्याची चेन लांबवली.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- ०९:-* येथील पेट्रोल पंपानजीक एका वृद्ध महिला दुकानदाराला बोलण्यात गुंतवून दोन अनोळखी भामट्यांनी ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन लंपास केली. या प्रकरणी दुकानदार मायावती भाईनाथ रजपूत (७०, कलमठ-गोसावीवाडी) यांच्या फिर्यादीवरून दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

मायावती रजपूत यांचे कणकवली पेट्रोल पंपनजीक दुकान आहे. सोमवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या दुकानात कंबरेचा पट्टा खरेदी करण्याच्या बहाण्याने आले. एकाने २०० रुपये किमतीचा पट्टा खरेदी केला. त्यानंतर अन्य एकाने मायावती यांना ‘येथे जवळपास कुठे देवीचे मंदिर आहे का?’ अशी विचारणा केली. त्यावर मायावती यांनी जवळच भालचंद्र महाराजांचा मठ असल्याचे सांगितले. त्यावेळी त्याने ‘आम्हाला मंदिरात देणगी द्यायची आहे’, असे सांगितले. त्यानंतर त्याने एका कागदावर तीन हजार रुपये रोख ठेवले आणि मायावती यांना सांगितले की, ‘तुमच्या गळ्यातील चेन या कागदावर ठेवा. मला तुमचे काहीतरी पुण्य मिळेल.’ मायावती यांनी ती चेन खोटी असल्याचे सांगितले. मात्र, भामट्यांनी त्यांना आपल्या गोड बोलण्यात असे काही गुंतवले की, मायावती यांनी आपल्या गळ्यातील चेन त्यांना काढून दिली. त्यांनी ती चेन कागदात बांधली आणि ती कागदाची पुडी मायावती यांच्या हातात दिली. मायावती यांनी ती पुडी उघडून पाहिले असता त्यात काळी राख असल्याचे दिसले. तोपर्यंत ते दोन्ही भामटे तिथून पसार झाले होते.

आपली फसवणूक झाल्याचे आणि गळ्यातील सहा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. चोरी करून पळून गेलेल्यामधील एकाने पांढऱ्या रंगाचा फूल हाताचा शर्ट, निळी पॅन्ट,पाठीवर सॅक (बॅग) आणि डोक्यावर काळ्या रंगाची टोपी, तर दुसयाने काळ्या रंगाचे जॅकेट, काळी पॅन्ट आणि डोक्यावर हेल्मेट घातले होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!