🛑रस्त्याची गटारे झालीत कचराकुंडी?
*🛑रस्त्याची गटारे झालीत कचराकुंडी?*
*🛑आजगाव,मळेवाड,कोंडुरे, सातार्डा,आरोंदा रस्त्याच्या गटारात कचराच कचरा.*
*🛑लोकांच्या बेजबाबदारपणामुळे स्वच्छता अभियानाचा फज्जा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि- ०८:-* शासन एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च करून जनतेला स्वच्छतेचे धडे देत आहे, तर दुसरीकडे मात्र काही लोकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे सार्वजनिक व्यवस्था धोक्यात आली आहे.
आजगाव , मळेवाड कोंडुरे सातार्डा,आरोंदा या रस्त्यांच्या बाजूची गटारे आता चक्क ‘सार्वजनिक कचरा कुंड्या’ बनल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे.
कोणतीही भीती किंवा लाज न बाळगता सर्रासपणे काही लोक आपला घरगुती आणि व्यावसायिक कचरा थेट गटारात फेकत आहेत.
काही लोक आळसामुळे किंवा निष्काळजीपणामुळे कचरा थेट नदी नाल्यात,रस्त्याच्या गटारात टाकत आहेत. यामध्ये प्लास्टिक पिशव्या, शिळे अन्न, काचेच्या, प्लास्टिक बाटल्या,कपडे,आणि इतर टाकाऊ वस्तूंचा समावेश आहे. परिणामी, कचरा अडकून गटारे तुंबत आहेत आणि घाण पाणी रस्त्यावर पसरत आहे.तसेच ह्या टाकाऊ वस्तू गुरे खात असल्याने त्याचा परिणाम या मुख्या प्राण्यांना भोगावा लागत आहे.
दिवसेंदिवस गटारांमधील कचऱ्याचे ढीग वाढत चालले आहेत. यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पावसाळा तोंडावर असताना अशी परिस्थिती राहिल्यास डेंग्यू, मलेरिया आणि गॅस्ट्रोसारख्या घातक आजारांची साथ पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियानाला’ अशा काही बेजबाबदार लोकांमुळे हरताळ फासला जात आहे. प्रशासनाने केवळ उपदेश न देता आता अशा लोकांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी सुजाण नागरिकांमधून होत आहे. जोपर्यंत कचरा टाकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होत नाही, तोपर्यंत हे चित्र बदलणार नाही असे दिसते.
आजगाव ग्रामपंचायत कडून दखल..
आजगाव ते मळेवाड या रस्त्याच्या गटारात राजरोस पणे कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले असताना,ह्या गंभीर घटनेची दखल घेत आजगाव ग्रामपंचायत वतीने आजगाव परिसर रस्ता गटारात हा टाकलेला कचरा एकत्रित गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली होती.त्याच प्रमाणे या रस्त्यावर काही भागात , मार्गदर्शक सूचना फलक लावून स्वच्छतेबाबत जागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र काही दिवसांनी परत या ठिकाणी काही लोकांकडून कचरा टाकण्याचे प्रकार वाढले असून अशा लोकांकडून ही गटारे,विद्रूप करण्याचे प्रकार वाढले आहेत.त्यामुळे अशा लोकांना शासन होणे तेवढेच गरजचे आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

