कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाचा लाभ घ्या !

*🛑प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाचा लाभ घ्या !*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴ओरोस, दि- ०८:-* केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानास यंदा दहा वर्षे पूर्ण होत असून,या दशकपूर्ती वर्षानिमित्त मंगळवार,९ जून रोजी जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये विशेष आरोग्य सत्रांचे आयोजन केले आहे. यात गर्भवती महिलांना दर्जेदार, सर्वसमावेशक व तज्ज्ञ प्रसूतीपूर्व आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाने सांगितले. जिल्ह्यातील ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, सर्व आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये विशेष सत्रांचे आयोजन केले आहे. गर्भवती महिलांची प्रसूतीपूर्व तपासणी, उच्च जोखमीच्या गर्भधारणेची ओळख, प्रयोगशाळा तपासण्या, समुपदेशन व आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे. विशेष सत्रांमध्ये रक्तदाब, वजन, हिमोग्लोबिन, रक्तातील साखर, मूत्र तपासणी तसेच आवश्यकतेनुसार इतर तपासण्या करण्यात येणार आहेत. गर्भाच्या वाढीचे मूल्यमापन करून माता व बाल आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच पोषण, स्तनपान, संस्थात्मक प्रसुती, जन्मपूर्व व जन्मानंतरची काळजी याविषयी सविस्तर समुपदेशन केले जाणार आहे.

अभियानादरम्यान उच्च जोखमीच्या गर्भवती महिलांची विशेष नोंद घेऊन त्यांना आवश्यकतेनुसार उच्चस्तरीय आरोग्य संस्थांकडे संदर्भित करण्यात येणार आहे. अशा महिलांच्या नियमित पाठपुराव्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले असून आवश्यकतेनुसार अल्ट्रासोनोग्राफी व तज्ज्ञ स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला उपलब्ध करून देण्यात येईल. ई-संजीवनी दूरवैद्यकीय सेवेद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांशी सल्लामसलत करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

गर्भवती महिलांना आयर्न फॉलिक अॅसिड, कॅल्शियम गोळ्या व इतर आवश्यक औषधांचा पुरवठा करण्यात येणार आहे. आशा स्वयंसेविका, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी यांच्या माध्यमातून पात्र लाभार्थी महिलांशी संपर्क साधून त्यांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व गर्भवती महिलांनी नजीकच्या आरोग्य संस्थेत आयोजित प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या विशेष सत्रांचा लाभ घ्यावा व स्वतः सह बाळाच्या आरोग्याची काळजी घ्या, असे आवाहन आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्गने केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!