🛑राजवाड्याची साफसफाई की नगरपरिषदेचा कारभार?; साक्षी वंजारींचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात.
*🛑राजवाड्याची साफसफाई की नगरपरिषदेचा कारभार?; साक्षी वंजारींचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात.*
*🛑”नगरसेवकांना सफाई कर्मचारी समजता का? शहरातील प्रश्न सोडून खाजगी मालमत्तेची स्वच्छता का?”*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०८:-* सावंतवाडी नगरपालिकेच्या सत्ताधारी नगरसेवकांकडून राजवाडा परिसरात राबविण्यात आलेल्या साफसफाई मोहिमेवर काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांनी जोरदार टीका करत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “नगराध्यक्ष नगरसेवकांना आपले सफाई कर्मचारी समजतात का?” असा थेट सवाल करत त्यांनी नगरपरिषदेच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला आहे.
वंजारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यभर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने सावंतवाडीतील राजवाडा परिसरात नगराध्यक्षा श्रद्धा भोसले, लखमराजे भोसले तसेच भाजपच्या काही नगरसेवक, नगरसेविका आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साफसफाई मोहीम राबविण्यात आली. मात्र हा कार्यक्रम भाजपचा असेल तर त्याची अधिकृत प्रसिद्धी का करण्यात आली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
*”सार्वजनिक ठिकाणे सोडून राजवाडाच का?”*
साफसफाई मोहीम राबवायचीच होती तर नरेंद्र डोंगर परिसर, जगन्नाथराव भोसले उद्यान, जिमखाना परिसर, मोती तलावाचा काठ तसेच तळ्यात साचलेल्या प्लास्टिक कचऱ्याची स्वच्छता का करण्यात आली नाही? अशी विचारणा करत वंजारी यांनी सार्वजनिक ठिकाणांऐवजी राजवाडा परिसराची निवड करण्यात आल्यामागील कारण स्पष्ट करण्याची मागणी केली.”खाजगी मालमत्तेच्या परिसरात साफसफाई मोहीम राबविण्याचा अधिकार नेमका कोणत्या निकषांवर वापरण्यात आला?” असा थेट सवालही त्यांनी केला.
*”निवडणुकीत केलेले विधान खरे ठरत असल्याची चर्चा”*
सावंतवाडीतील नागरिक आणि नगरसेवकांना त्यांच्या कामांसाठी राजवाड्याचे उंबरठे झिजवावे लागतील, तसेच नगरपरिषदेचा कारभार राजवाड्यातूनच चालेल, असे आपण निवडणुकीदरम्यान म्हटले होते, याची आठवण करून देत वंजारी म्हणाल्या की, निवडणुकीनंतर अनेक बैठका राजवाड्यात झाल्याची चर्चा शहरातील व्यापारी वर्गात होती. कालच्या साफसफाई मोहिमेमुळे त्या चर्चेला आणखी बळ मिळाले आहे.
“शहर समस्यांनी वेढलेले, सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष”
आज सावंतवाडी शहर उघडी गटारे, खड्डेमय रस्ते, भटके कुत्रे जनावरांचा मुक्त संचार, पाईपलाईनच्या कामातील त्रुटी अशा अनेक मूलभूत समस्यांनी ग्रासलेले आहे. मात्र या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून सत्ताधारी वेगळ्याच कामांमध्ये व्यस्त असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली असल्याचा आरोप त्यांनी केला.
*”प्रशासकीय कारभारच चांगला होता, अशी नागरिकांची भावना”*
नगराध्यक्षा आणि नगरसेवकांनी शहरात फिरून नागरिकांच्या अडचणी जाणून घ्याव्यात. सध्या अनेक नागरिक “यापेक्षा प्रशासकीय कारभार अधिक चांगला होता” अशी प्रतिक्रिया देत असल्याचे वंजारी यांनी सांगितले.
*महायुतीतील नगरसेवकांचाही अप्रत्यक्ष नाराजीचा सूर?*
शिवसेनेचे नगरसेवक बाबू कुरतडकर यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर “नगरसेवकांची राजवाड्यात खरी कमाई” असा स्टेटस ठेवला होता. हा विषय शहरात चर्चेचा ठरला होता. आता महायुतीतील काही नगरसेवकही उघडपणे बोलू लागल्याचे दिसत असल्याचा दावा वंजारी यांनी केला.
*”पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे; अन्यथा काँग्रेस रस्त्यावर”*
नगरपरिषदेतील सुरू असलेल्या घडामोडींवर पालकमंत्र्यांनी वेळीच लक्ष घालावे. अन्यथा विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशाराही साक्षी वंजारी यांनी दिला आहे.
*जारींचे प्रमुख सवाल*
नगरसेवकांना सफाई कर्मचारी समजले जाते का?सार्वजनिक ठिकाणे सोडून राजवाड्याचीच निवड का?भाजपचा कार्यक्रम असेल तर अधिकृत प्रसिद्धी का नाही?
खाजगी मालमत्तेत साफसफाई मोहीम राबविण्याचा अधिकार कोणत्या निकषांवर?शहरातील मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष का?
राजवाडा साफसफाई मोहिमेवरून सावंतवाडीतील राजकारण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत असून सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

