🛑जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘प्लास्टिकमुक्त नरेंद्र डोंगर’ अभियानाची सुरुवात.
*🛑जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘प्लास्टिकमुक्त नरेंद्र डोंगर’ अभियानाची सुरुवात.*
*🛑वनविभागाची स्वच्छता मोहीम;जिल्हाभरात ५ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : नाना धोंड*
*🎴सावंतवाडी, दि- ०६:-* जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत सावंतवाडी वनविभागाच्या वतीने नरेंद्र डोंगर येथे स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी ‘प्लास्टिकमुक्त नरेंद्र डोंगर’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची घोषणा केली. तसेच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळून कचरा कुंड्यांचा वापर करावा,असे आवाहन त्यांनी केले.
नरेंद्र डोंगरावर आयोजित कार्यक्रमात पर्यावरणप्रेमी, पत्रकार, वनाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बोलताना श्री. शर्मा यांनी सांगितले की, दरवर्षीप्रमाणे यंदाही वनविभागाच्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. नरेंद्र डोंगर परिसरात वाढत्या प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत असल्याने ‘प्लास्टिकमुक्त नरेंद्र डोंगर’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची सुरुवात पर्यावरण दिनानिमित्त करण्यात आली.
याचबरोबर जिल्हाभरात पुढील १५ दिवसांत ५ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार असून त्यामध्ये दीड हजार वडाची झाडे आणि साडेतीन हजार औषधी गुणधर्म असलेल्या नरक्या वृक्षांचा समावेश आहे. गतवर्षी लावण्यात आलेल्या सुरंगी वृक्षांचीही योग्य प्रकारे जोपासना सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
वनपर्यटनाला चालना देण्यासाठी वनविभाग विविध उपक्रम राबवत असून पारपोली, नरेंद्र डोंगर आणि आंबोली परिसरात पर्यटकांसाठी होमस्टे सुविधा उपलब्ध आहेत. आगामी आंबोली वर्षा पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र डोंगर येथे ‘वर्षा वन पर्यटन’ उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही श्री. शर्मा यांनी स्पष्ट केले.
यावेळी पर्यावरणप्रेमी डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी नरेंद्र डोंगर परिसरातील खासगी वनक्षेत्रातून गोळा झालेला कचरा ही समाजासाठी चिंतेची बाब असल्याचे सांगितले. वृक्षारोपणाबरोबरच पिढ्यान् पिढ्या वाढलेल्या जुन्या वृक्षांचे संवर्धन करणे तितकेच आवश्यक असून या वृक्षांना आपल्या ‘आजी-आजोबां’प्रमाणे जपले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमात पर्यावरणप्रेमी डॉ. जयेंद्र परुळेकर, संदीप सावंत, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, सहसचिव विनायक गावस, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, पत्रकार रुपेश हिराप, नागेश पाटील, भूवन नाईक, श्रीरंग सावंत, तनया रेडकर यांच्यासह वनक्षेत्रपाल सुहास पाटील, वनपाल मिताली कुबल, प्रमोद राणे, वनरक्षक आणि अनेक पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.
दरम्यान, स्वच्छता मोहिमेदरम्यान नरेंद्र डोंगर परिसरातून तब्बल ५० गोण्या प्लास्टिक व इतर कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली, हे या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

