🛑गुणवत्तेचा दीपस्तंभ : शारदा विद्यालय मळगाव रस्ता.
*🛑गुणवत्तेचा दीपस्तंभ : शारदा विद्यालय मळगाव रस्ता.*
*🛑शैक्षणिक वर्ष २०२६–२०२७ साठी प्रवेश सुरू.*
*🛑’एकच ध्यास, सर्वांगीण विकास’ : गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पालकांचा वाढता विश्वास*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी, दि- ०६:-* ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची भक्कम पायाभरणी करून उज्ज्वल भविष्याकडे नेण्याचे कार्य गेली अनेक दशके जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शारदा विद्यालय मळगाव रस्ता करत आहे. ४ ऑगस्ट १९१४ रोजी स्थापन झालेल्या या शाळेने शतकी पार केली असून “एकच ध्यास, सर्वांगीण विकास” या ब्रीदवाक्याला अनुसरून पिढ्यान्पिढ्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा जपली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६–२०२७ साठी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून पालकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. आपल्या पाल्याचा प्रवेश लवकरात लवकर निश्चित करावा, असे आवाहन शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
*आधुनिक सुविधांसह सुरक्षित आणि आनंददायी शैक्षणिक वातावरण*
मळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शारदा विद्यालय मळगाव रस्ता ही गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षणाची विश्वासार्ह ओळख बनली आहे. इयत्ता १ ली ते ४ थीपर्यंत शिक्षण देणारी ही शाळा सर्व भौतिक सुविधांनी सुसज्ज, स्वच्छ व सुरक्षित वातावरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत आहे. शाळेच्या आकर्षक, सुसज्ज इमारतीसह प्रसन्न परिसर विद्यार्थ्यांसाठी अभ्यासास अनुकूल ठरत आहे.
*गुणवत्तापूर्ण अध्यापनासोबत आधुनिक शिक्षणाची सांगड*
शाळेत गुणवत्तापूर्ण अध्यापन, संगणक शिक्षण, तसेच स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन वर्ग नियमितपणे राबविले जातात. यासोबतच विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी क्रीडा नैपुण्यास प्रोत्साहन, विविध उपक्रमांचे नियोजन आणि सहशालेय कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक आणि नैतिक विकास घडवण्यावर विशेष भर दिला जातो.
*विद्यार्थीकेंद्रित अध्यापन व पालकांशी सातत्यपूर्ण संवाद*
शाळेतील शिक्षकवृंद विद्यार्थीकेंद्रित पद्धतीने अध्यापन करत असून पालकांशी सातत्याने संवाद साधला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवणे सोपे होते. स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा, अभ्यासपूरक साधने, खेळाचे मैदान अशा सर्व मूलभूत सोयी उपलब्ध असल्याने शाळेचा शैक्षणिक दर्जा अधिक उंचावला आहे.
*२०२६–२०२७ साठी प्रवेश सुरू; पालकांना आवाहन*
या शाळेत शैक्षणिक वर्ष २०२६–२०२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून पालकांनी आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी वेळेत प्रवेश निश्चित करावा. “आजच प्रवेश निश्चित करा” असा संदेश देत शाळा पालकांना आमंत्रित करत आहे. प्रवेश संपर्कासाठी ७४९९९४६४३८ / ७३५०१६९०७३ या नंबरवर संपर्क साधून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शाळा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
*शाळेची वैशिष्टचे*
*सर्व भौतिक सुविधांनी युक्त सुसज्ज शाळा इमारत*
*गुणवत्तापूर्ण शिक्षण*
*स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग*
*संगणक शिक्षण*
*क्रीडा नैपुण्यास वाव*
*सह शालेय उपक्रमांचे यशस्वी आयोजन*
*शाळेचा पत्ता*
पत्ता: जि. प. प्राथमिक शाळा मळगाव रस्ता, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

