कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑उपजिल्हा रुग्णालयातील बोगस टाक्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर.

*🛑उपजिल्हा रुग्णालयातील बोगस टाक्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर.*

 

*🛑प्रसूतीनंतर महिलांना त्रास; चौकशीची मागणी, संबंधित नसलेल्या अधिकाऱ्यांना लक्ष्य करणे योग्य का?*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०४:-* सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती झालेल्या महिलांना टाक्यांमुळे त्रास झाल्याची घटना समोर आल्यानंतर पुन्हा एकदा रुग्णालयातील वैद्यकीय साहित्याच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र, ही अशा प्रकारची पहिलीच घटना नसल्याचा दावा काही जाणकारांकडून करण्यात येत असून, यापूर्वीही अशा तक्रारी वेळोवेळी समोर आल्याची माहिती उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे.

माजी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांच्या निवृत्तीनंतर अनेकदा अशा स्वरूपाच्या घटना घडल्याची चर्चा असतानाच, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. ऐवळे यांच्या निवृत्तीनंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी पुन्हा एकदा अशा प्रकारची घटना समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे रुग्णालयात वापरण्यात येणाऱ्या टाक्यांच्या दोऱ्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, या प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक किंवा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना थेट जबाबदार धरणे कितपत योग्य आहे, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. रुग्णालयांमध्ये शासनाकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या साहित्याचाच वापर केला जातो. काही वेळा टाक्यांचा दोरा दर्जेदार नसल्याचे लक्षात आल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांना पूर्वकल्पना देऊन आवश्यक साहित्य बाहेरून आणण्यास सांगितल्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या असल्याचे समोर येत आहे.

याच पार्श्वभूमीवर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचा वैद्यकीय अधीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे डॉ. संदीप सावंत यांच्याबाबतही सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. कर्तव्यदक्ष आणि अनुभवी अधिकारी म्हणून त्यांची ओळख असून त्यांनी यापूर्वी सावंतवाडी तसेच शिरोडा येथील रुग्णालयांचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळला आहे. त्यामुळे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाची धुरा देखील ते सक्षमपणे सांभाळतील, असा विश्वास अनेकांकडून व्यक्त केला जात आहे.

एका घटनेच्या आधारे संबंधित विभागाशी थेट संबंध नसलेल्या अधिकाऱ्यांना लक्ष्य करणे योग्य नसल्याचे मतही व्यक्त होत आहे. नेमकी चूक कुठे झाली, टाक्यांचा दर्जा निकृष्ट होता का, पुरवठा प्रक्रियेत काही त्रुटी होत्या का, याची सखोल चौकशी शासन स्तरावर होणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरू लागली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!