🛑चौकुळमध्ये कुंकुमार्जन सोहळ्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
*🛑चौकुळमध्ये कुंकुमार्जन सोहळ्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.*
*🛑दिनेश गावडे व सौ. सुप्रिया गावडे यांचा स्त्रीशक्ती सन्मानाचा स्तुत्य उपक्रम; शेकडो महिलांचा सहभाग.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०२:-* भारतीय संस्कृतीत सौभाग्य, पावित्र्य आणि स्त्रीशक्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या कुंकवाचे महत्त्व अधोरेखित करणारा भव्य कुंकुमार्जन सोहळा शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे व सौ. सुप्रिया गावडे यांच्या पुढाकारातून चौकुळ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याला परिसरातील तीनशे ते चारशे महिला भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उपस्थिती लावली.
कोल्हापूर येथील विद्वान पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात दिनेश गावडे व सौ. सुप्रिया गावडे यांच्या हस्ते कुंकुमार्जन करून करण्यात आली. सकाळी ९ वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम दुपारी ३ वाजेपर्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात सुरू होता.
महिलांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक प्रबोधनासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सकल हिंदू व मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष तथा कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलचे संपादक सीताराम गावडे यांनी उपस्थित महिला भगिनींना कुंकुमार्जनाचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व सविस्तरपणे पटवून दिले. “कुंकू हे केवळ सौभाग्याचे प्रतीक नसून भारतीय संस्कृतीतील स्त्रीच्या सन्मानाचे आणि कुटुंबातील तिच्या स्थानाचे प्रतीक आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांच्या प्रबोधनात्मक मार्गदर्शनाला उपस्थित महिलांनी उत्स्फूर्त दाद दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांमधून लकी ड्रॉ काढण्यात आला. यामध्ये पाच भाग्यवान महिलांना आकर्षक पैठण्या भेटस्वरूप देऊन गौरविण्यात आले. यामुळे कार्यक्रमात अधिक उत्साह निर्माण झाला.या सोहळ्याला पंचायत समिती सदस्य मायकल डिसोझा, भरत गावडे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी समाजप्रबोधन आणि सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल सीताराम गावडे यांचा दिनेश गावडे व सौ. सुप्रिया गावडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि श्री पांडुरंगाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
स्त्रियांच्या सन्मानासाठी, संस्कृतीच्या जतनासाठी आणि समाजात सकारात्मक संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा कुंकुमार्जन सोहळा परिसरात चर्चेचा विषय ठरला. दिनेश गावडे व सौ. सुप्रिया गावडे यांनी राबविलेला हा उपक्रम महिलांच्या एकात्मतेला बळ देणारा आणि भारतीय संस्कृतीचे जतन करणारा आदर्श उपक्रम असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

