कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑आंब्रड पंचक्रोशीतील महावितरण समस्या लागल्या मार्गी…

*🛑आंब्रड पंचक्रोशीतील महावितरण समस्या लागल्या मार्गी…*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- २९:-* विभागीय भाजप आंब्रड व सरपंच यांच्या लढ्या मुळे महावितरण विभाग यंत्रणा लागली कामाला गुरुवार २८ मे २०२६ पासून आंब्रड विभागाला कणकवली महावितरणवरून विद्युत पुरवठा सुरु झाला. त्यासाहीत दोन नवीन ट्रान्सफॉर्मर,विद्युत पुरवठ्यात अत्यंत आवश्यक असलेल्या ठिकाणी आठ पोल उभारण्यात आले.

२५ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे (महावीतरण) विभागीय कार्यालय कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पावसाळ्यापूर्वी निर्माण होणाऱ्या वीज समस्या व रखडलेली कामे या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या वतीने लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी विद्युत समस्यांबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते.

अनेक दिवसांपासून ग्रामीण तसेच शहरी भागात विजेचा मोठा खेळखंडोबा सुरू होता. कुठलीही सूचना न देता भारनियमन, लो होल्टेज वीज पुरवठा, जुन्या विद्युत वाहिन्या या सर्व समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. अनेक वेळा तक्रार करूनही स्थानिक पातळीवर महावितरणाचे अधिकारी व कर्मचारी याबाबत गांभीर्याने लक्ष घालत नसून त्याबाबत लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते.

महावितरण अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांना लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी विभागातील समस्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. नागरिकांच्या या आक्रोशाचा अंत न पाहता महावितरणाने विद्युत समस्यांचा गांभीर्याने विचार करून त्वरित त्या समस्या सुधाराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या वतीने दिला होता. या निगडित महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारून वरिष्ठ पातळीवर चर्चा करून जिल्हा संघटना व लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सर्व समस्या त्वरित मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते.

विभागीय आंब्रड भाजप केशव उर्फ आबा मुंज, पांडुरंग दळवी, स्वप्नील मुंज व सरपंच सौ मानसी कदम यांनी मांडलेल्या आंब्रड पंचक्रोशीतील महावितरणाच्या समस्यांची महावितरण विभागाने दखल घेत गुरुवार २८ मे २०२६ पासून आंब्रड विभागाला कणकवली महावितरणवरून विद्युत पुरवठा सुरु केला . त्यासाहीत दोन नवीन ट्रान्सफॉर्मर,विद्युत पुरवठ्यात अत्यंत आवश्यक असलेल्या ठिकाणी आठ पोल उभारण्यात आले. पावसाळ्याच्या व वादळ वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर विद्युत वाहिन्यांवरील झाडांच्या फांद्यांची साफसफाई केली.

आंब्रड विभागीय भाजप कार्यकर्ते व सरपंच यांनी महावितरण विभागावर नागरिकांच्या समस्यांचा आवाज उठवल्यामुळे अनेक वर्षे दुर्लक्षित असलेल्या विद्युत पुरवठ्याच्या समस्यांचे निवारण होतं आहे याबद्दल ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!