🛑शाळांमध्ये वह्या विक्रीचा धंदा बंद करा;अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार
*🛑शाळांमध्ये वह्या विक्रीचा धंदा बंद करा;अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार*
*🛑सिंधुदुर्ग स्टेशनरी संघटनेचा इशारा; “शिक्षकांनी विद्यादान करावे, व्यापार नव्हे” — साईशकुमार केसरकर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २८:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक अनुदानित व सीबीएसई शाळांमध्ये बेकायदेशीररीत्या वह्या, पेन व अन्य शैक्षणिक साहित्यांची विक्री सुरू असून पालकांवर विशिष्ट साहित्य खरेदीची सक्ती केली जात असल्याचा गंभीर आरोप सिंधुदुर्ग स्टेशनरी संघटनेने केला आहे. शासनाचे स्पष्ट आदेश असतानाही काही शैक्षणिक संस्था नियमांचे उल्लंघन करत असल्याने संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.
सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना स्टेशनरी संघटनेचे राज्य कमिटी सदस्य पुरुषोत्तम कुडतरकर यांनी सांगितले की, “शाळांमध्ये वह्या विक्रीचा व्यापार चालणार नाही, असे शासनाचे आदेश स्पष्ट आहेत. शिक्षणमंत्री व पालकमंत्र्यांनी देखील याबाबत निर्देश दिलेले आहेत. तरीदेखील काही शाळांनी थेट दुकानदारी सुरू केली आहे. हे सरळसरळ नियमांचे उल्लंघन असून येत्या चार दिवसांत जिल्हास्तरीय बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल.”
“शिक्षणमंत्री आणि पालकमंत्र्यांचे आदेश जर काही संस्था जुमानत नसतील, तर अशा संस्थांवर कारवाई करणार कोण?” असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साईशकुमार केसरकर यांनी अधिक आक्रमक भूमिका मांडताना सांगितले की, “जिल्हा परिषद शाळांमध्येही विद्यार्थ्यांना विशिष्ट वह्या घेण्याची सक्ती केली जात आहे. शिक्षकांनी शिक्षण देण्याचे काम करावे; व्यापार करू नये. धंदा करण्यासाठी आम्ही स्टेशनरी विक्रेते बसलो आहोत आणि शासनाला करही भरत आहोत.”
कराड येथे सुरू असलेल्या स्टेशनरी विक्रेत्यांच्या उपोषणाला सिंधुदुर्ग स्टेशनरी संघटनेने जाहीर पाठिंबा दिला असून जिल्ह्यातील पदाधिकारी लवकरच त्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
पत्रकार परिषदेला सिंधुदुर्ग स्टेशनरी संघटनेचे अध्यक्ष साईशकुमार केसरकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष नित्यानंद कोरगावकर, राज्य कमिटी सदस्य पुरुषोत्तम कुडतरकर यांच्यासह सोहम पेडणेकर, शेखर पेडणेकर, प्रवीण आईर, सुनील केसरकर, अण्णा मठकर, संदीप सावंत, प्रसाद माधव, ऋतिक कोरगावकर, दीपक सावंत, बाळकृष्ण पेडणेकर, समीर घाडीगांवकर, नारायण नाईक आदी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

