कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सातार्डा येथील निवृत्त सैनिक हवालदार चंद्रकांत पवार यांच्या पार्थिवावर सैनिकी शिस्तीत अंत्यसंस्कार.

*🛑सातार्डा येथील निवृत्त सैनिक हवालदार चंद्रकांत पवार यांच्या पार्थिवावर सैनिकी शिस्तीत अंत्यसंस्कार.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २७:-* देशसेवेचा दैदिप्यमान वारसा लाभलेले आणि १९६५ व १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील वीरयोद्धे, सातार्डा येथील निवृत्त सैनिक हवालदार चंद्रकांत जयराम पवार (वय ८२) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सातार्डा येथील तरचावाडा वैकुंठ स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने सातार्डा परिसरासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होत आहे.

२६ वर्षे सैन्यदलात, तर १५ वर्षे एसटी महामंडळात सेवा

चंद्रकांत पवार हे अगदी लहान वयातच भारतीय सैन्यात दाखल झाले होते. त्यांनी ‘आर्मी सर्व्हिस कोर’ (ASC) मध्ये तब्बल २६ वर्षे देशसेवा केली. यादरम्यान त्यांनी १९६५ आणि १९७१ च्या ऐतिहासिक युद्धांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. सैन्यदलातून हवालदार पदावरून निवृत्त झाल्यानंतरही त्यांची कर्मभूमी थांबली नाही. त्यांनी राज्य परिवहन महामंडळात (MSRTC) बस चालक म्हणून १५ वर्षे सेवा बजावली. या काळात त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विभागीय कार्यालयांतर्गत देवगड, मालवण, कुडाळ, सावंतवाडी आणि वेंगुर्ले अशा विविध डेपोमध्ये आपली सेवा दिली होती.

सैनिकी गणवेश आणि देशप्रेमाची अखंड ज्योत

सैन्यातून निवृत्त होऊन अनेक वर्षे झाली तरी त्यांच्यातील ‘सैनिक’ कायम जिवंत होता. दरवर्षी स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी ते सातार्डा ग्रामपंचायतीच्या ध्वजारोहण कार्यक्रमाला न चुकता उपस्थित राहत. वयाच्या ८२ व्या वर्षीही ते अगदी कडक इस्त्रीचा युनिफॉर्म, पॉलिश केलेला बेल्ट आणि बूट घालून सैनिकी थाटात ध्वजाला कडक सॅल्यूट देत असत. त्यांचा हा उत्साह तरुण पिढीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरत होता.

देशसेवेसोबतच समाजसेवेतही ते नेहमी अग्रेसर असत. गावातील सार्वजनिक रस्ता व्हावा, यासाठी त्यांनी थेट उपोषण आंदोलन करण्याचीही तयारी दर्शवली होती.

मान्यवरांसह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी सातार्डा येथील निवासस्थानी ठेवण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आणि ग्रामस्थांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले.

सावंतवाडी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर, पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ये, निवृत्त अधिकारी राजा वाडीकर, निवृत्त मालवण गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, निवृत्त गोवा उपजिल्हाधिकारी काशिनाथ सातार्डेकर, पणजी महा न पचे दीपक सातार्डेकर, हुमरस पोलीस पाटील सुरेश चव्हाण, निवृत्त हायस्कूल मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मांजरेकर, नारायण बागकर, ज्येष्ठ नागरिक प्रभाकर मांजरेकर, गजानन शिरसाट, धनंजय केरकर, चर्मकार समाजाचे बांधव पी.बी.चव्हाण, संत रोहिदास सहकारी पतसंस्थेचे व्हाइस चेअरमन बाबुराव चव्हाण, गणेश म्हापणकर, दिलीप इन्सुलकर, सुभाष बांबुळकर, उत्तम चव्हाण, महेश चव्हाण, महेश मोचेमाडकर, संदेश मोचेमाडकर,एकनाथ चव्हाण, विजय होडावडेकर,सुधाकर बांदेकर, अशोक चव्हाण, कृष्णा आसोलकर, योगेश्वर कडू, अविनाश होडावडेकर, संग्राम मोरे,अशोक पिळणकर, सतिश काळसेकर संतोष पवार,सत्यदीप सातार्डेकर तुळशीदास पवार,शेखर पवार,सेंट्रल बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री. सावंत पोलीस अधिकारी शेखर दाभोलकर आदींसह शेकडो नागरिक अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.

प्रशांत भूमी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांना समाज बांधवांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी पीबी चव्हाण यांनी त्यांच्या जीवनातील पैलवान प्रकाश झोत टाकला महिन्यापूर्वी महिन्याभरापूर्वी त्यांची पत्नी कै चंद्रावती पवार ह्याचे दुखत निधन झाले होते त्यानंतर पवार कुटुंबियांवर चंद्रकांत पवार यांच्या मृत्यूने दुःखाचा पहाड कोसळला असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी बोलताना केला

मोठा कौटुंबिक परिवार

दिवंगत चंद्रकांत पवार यांच्या पश्चात दोन मुलगे, चार मुली, सुना, जावई, बहिणी, भाऊ, वहिनी, पुतणे, नातवंडे आणि पतवंडे असा मोठा परिवार आहे. ते पत्रकार हरिश्चंद्र पवार व इंजिनिअर जयराम (बाळा) पवार यांचे वडील होत.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!