कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾ बांदा-सटमटवाडी परप्रांतीय कामगार खून प्रकरणी अटकेत असलेल्या दोघा संशयितांना जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला..

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी:शैलेश गवस

  🎴बांदा,दि-०८:-  बांदा-सटमटवाडी येथे टोल नाक्यावर घडलेल्या परप्रांतीय कामगाराच्या खून प्रकरणात अटकेत असलेल्या दोघा संशयितांचा जामीन अर्ज आज जिल्हा न्यायालयाने नामंजूर केला आहे. या प्रकरणातील अन्य दोघे संशयित फरारी असल्याने हा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.याकामी सरकारी वकील ऍड. रुपेश देसाई यांनी काम पाहिले.

या चौघा संशयितांनी लक्ष्मण बसाप्पा पाडेवार (वय ३८, रा. गुलबर्गा-कर्नाटक) याचा सटमटवाडी तपासणी नाका परिसरात खून केला होता. ही घटना २२ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री घडली होती. मयत लक्ष्मण याची पत्नी सुजाता पाडेवार यांनी बांदा पोलिसात आपल्या पतीला मारहाण केल्यानेच मृत्यू झाल्याची फिर्याद दिली होती. बांदा पोलिसात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान यातील दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले होते. तर दोघे जण अद्याप फरार आहेत. त्यामुळे अटकेत असलेल्या दोघांचा जामीन अर्ज आज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!