महाराष्ट्रशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾ बांदा पोलीस तपासणी नाक्यावर महसूल विभागाची अचानक तपासणी मोहीम..

 

◾ सिंधुदुर्गातून गोव्यात गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांची केली परवाना तपासणी..

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी:शैलेश गवस

 🎴 बांदा, दि-०८-:  बांदा पोलीस तपासणी नाक्यावर महसुल विभागाने आज सकाळी अचानकपणे सिंधुदुर्गातून गोव्यात गौण खनिज वाहतुक करणार्‍या वाहनांची परवाना तपासणी मोहीम राबविली. मात्र, खराब नेटवर्कच्या अडचणीमुळे ऑनलाईन संदेश पाठविण्यात अडचणी निर्माण झाल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बांदा पोलीसांच्या सहकार्याने वाहतुक सुरळीत करण्यात आली.

नेटवर्क प्रॉब्लेमची माहिती प्रांताधिकारी कार्यालयाला दिल्यानंतर पास स्कॅन करुन वाहने सोडण्याचे निर्देश देण्यात आले. दुपारी १२ वाजेपर्यंत ९१ वाहनांची तपासणी करण्यात आल्याची माहिती तपासणी अधिकारी माडखोल तलाठी उत्तम सावंत व बांबर्डे तर्फ कळसुलीचे तलाठी आर. आर. तारी यांनी दिली. यामुळे महामार्गावर गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!