कोकणमहाराष्ट्रराजकीयवेंगुर्लेसिंधुदुर्ग

भाजपा महिला मोर्चा , वेंगुर्ले च्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या काळात अन्याय अत्याचाराला बळी पडून हत्या झाली अशा मुलींना मेणबत्ती लावून श्रद्धांजली

🖥️ Kokan Live Breaking News

 

✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत

🎴ठिकाण :वेंगुर्ले

महिला दिनाचे औचित्य साधून भाजपा महिला मोर्चा , वेंगुर्ले च्या वतीने आतापर्यंत अन्याय अत्याचाराला बळी पडून हत्या झाली अशा मुलींना Candle March मेणबत्ती लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .

यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना भाजपा जिल्हा चिटनीस अॅड. सुषमा खानोलकर म्हणाल्या की महाविकास आघाडी सरकारच्या दीड वर्षाच्या काळात झालेल्या राजकारणाच्या गुन्हेगारीकरणा विरोधात आता महीलांनी पुढे येऊन आवाज उठवला पाहिजे . कारण महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात गुन्हेगारांना बिनदिक्कत संरक्षण दिले जात आहे . तरुणीवर बलात्कार , तरुणींचे संशयास्पद मृत्यू या सारख्या गुन्ह्यामध्ये राज्यसरकारमधील अनेक मंत्र्यांची नावे थेटपणे घेतली जात आहेत . या मंत्र्यांना सरकार कडून संरक्षण दिले जात आहे .पुजा चव्हाण या तरुणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी भाजपाने आंदोलन केल्यावरच संबंधित मंत्र्याचा राजीनामा घेतला गेला . अहमदनगरचे रेखा जरे हत्याकांड , दिशा सालीयान गुढ आत्महत्या , शासकीय कोवीड सेंटरमध्ये बलात्काराचा प्रयत्न , काँग्रेस प्रवक्ते राजु वाघमारे यांचा भाऊ सुनीत वाघमारे यांचे वर बलात्काराचा आरोप , राष्ट्रवादी युवक काँग्रेस चा अध्यक्ष मेहबूब शेख विरोधात बलात्काराचे आरोप , मुंबईतील एका उच्चशिक्षित महिलेने संजय राऊत यांच्या विरोधात हायकोर्टात केलेली तक्रार अशा गंभीर प्रकरणातील एकाही घटनेमध्ये ठोस कारवाई झालेली दिसत नाही . गेल्या दिड वर्षात ज्याप्रमाणे महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढलेले आहेत ते खरोखरच दुर्दैवी आणि लज्जास्पद आहे .कारण जेव्हा कायद्याचे रक्षकच राक्षस बनतात , सरकार मधील मंत्रीच दोषी असतात , सत्ताधारी पक्षाचे नेते आणि कार्यकर्तेच बलात्काराचे आरोपी असतात त्यावेळी राज्यात मोगलाई आल्यासारखी वाटते .

यावेळी उपस्थित महिलांनी दोन मिनिटं उभे राहून तसेच मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली वाहिली .यावेळी महिला तालुका अध्यक्षा स्मिता दामले , जिल्हा सरचिटणीस सारीका काळसेकर , पंचायत समिती सदस्या गौरवी मडवळ , नगरसेविका शितल आंगचेकर , नगरसेविका साक्षी पेडणेकर , नगरसेविका श्रेया मयेकर , नगरसेविका क्रुपा मोंडकर , महिला ता सरचिटणीस व्रुंदा गवंडळकर , महिला शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर , ॠतुजा मेस्त्री , हसीना बेन मकानदार , अंकीता देसाई , संध्या गावडे , रीया केरकर , क्रुतीका साटेलकर , स्मिता कोयंडे , श्रद्धा गोरे , डाॅ. अफशान कौरी , सीमा नाईक तसेच तालुकास्तरावरील महिला मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या .

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

 

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

 

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे -*

*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕

चिकन थाळी-🍲

अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲

🥠 मटन फ्राय🫕

🫓चपाती भाजी

🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*

*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*

*_📱७५५९३९४१९९_*

*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!