शंकर तुकाराम वाघमोडे यांना ‘गुरुसेवा सन्मान’ पुरस्कार…
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी : दि. ०८ आमदार दिपकभाई केसरकर मित्रमंडळातर्फे दरवर्षी शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यात येते. शिक्षण क्षेत्रात अतिशय प्रामाणिक व तळमळीने आपले काम करीत असताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेमाची जाणीव निर्माण करण्याचे काम, करियर संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, शिष्यवृत्ती परीक्षा, कला, क्रिडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना सततचे मार्गदर्शन शिवाय अध्यापना बरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर, प्रशालेत मराठी सह इतर विषयांचे अध्ययन करीत असताना, एस. एस. सी परिक्षेत मराठी विषयाच्या १००% निकाल या सर्व कार्याची दखल घेऊन वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे हायस्कूलचे शिक्षक शंकर तुकाराम वाघमोडे यांना शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्याबद्दल मा. आ. दिपक केसरकर यांच्या हस्ते ‘गुरुसेवा सन्मान’ पुरस्काराने रोख रक्कम, प्रमाणपत्र व शाल- श्रीफळ, देऊन केसरकर मित्रमंडळातर्फे गौरविण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आलेला डिसेंबर महिन्यातील नियोजित हा कार्यक्रम काल मान्यवरांच्या उपस्थितीत सावंतवाडी येथे पार पडला. या कार्यक्रमाला मा.आ.दिपक केसरकर, शिवसेना नेते सतीश सावंत. तसेच मंडळाचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔥चुलीत भाजलेल्या काजु bbगरांची चवच न्यारी!🔥
💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..
🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..
💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..
⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!
🤷🏻♂️आजच संपर्क करा ⬇️
🥏9405184052 🪀
🥏9421544545 🪀
📤..फोन न लागल्यास मेसेज करा!
🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

