◾ रोटरी क्लब, सावंतवाडीच्या कार्याचे IFS दर्जाच्या शासकीय अधिकारी श्री.शहाजी नरनवर यांच्या कडून गौरव..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश मोरजकर
🎴सावंतवाडी, दि-०७:- आंतरराष्ट्रीय वन्यप्राणी दिना निमित्य रोटरी अध्यक्ष-रो.राजेश नवांगुळ आणि सचिव रो.दिलीप म्हापसेकर यानी सावंतवाडीतील वन विभागाच्या विभागीय कार्यालयाला भेट दिली. या कार्यालयाचे प्रमुख IFS अधिकारी श्री.शहाजी नरनवर याची सदिच्छा भेट घेऊन पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण साठी रोटरी क्लब, सावंतवाडीने केलेल्या कामांची कल्पना दिली. त्यात वन्यजीवांसाठी पाणवठा पुनरुजीवित केल्याचे सांगितले. वन्यजीव आणि पर्यावरण यांच्या जनजागृती साठी जागोजागी लावलेले फ्लाॕक्स आणि नियमित करीत असलेली नरेंद्र डोंगरावरील साफसफाई बद्दल फोटो दाखविले. हे सर्व कार्य पाहून ते प्रभावित झाले आणि त्यांनी रोटरी क्लब, सावंतवाडीच्या कार्याचे कौतुक केले. तसेच नरेंद्र डोंगरावर होत असलेल्या अनैतिक गोष्टींची कल्पना त्याना देण्यात आली. ही बाब आपल्यालाही निदर्शनास आली असुन यावर उपाय योजना करण्याचे त्यानी बोलून दाखविले.
रोटरी क्लब, सावंतवाडीच्या कार्याची प्रशंसा आणि समाजा प्रती त्याची तळमळ पाहून रो.दिलीप म्हापसेकर यानी D.F.C. श्री.शहाजी नरनवर साहेब याना रोटरीत येण्याचे निमंत्रण दिले आणि त्यानी लगेच आपली स्विकृती देऊन रोटरी क्लब, सावंतवाडी प्रवेश करण्याचे मान्य केले या त्याच्या रोटरीत येण्यामुळे त्याची सर्वसामान्य जनते विषयी असलेली तळमळ दिसुन आली.

