कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचा ७ वा दीक्षांत सोहळा उत्साहात संपन्न….

*🛑यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचा ७ वा दीक्षांत सोहळा उत्साहात संपन्न….*

 

*🛑”​यशस्वी होण्यासाठी सातत्य आणि प्रामाणिकता आवश्यक” : नगराध्यक्षा श्रद्धा भोसले*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०६:-* यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या २०२१–२५ या बॅचमधील विद्यार्थ्यांचा दीक्षांत सोहळा आज आनंद, अभिमान आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. भोसले नॉलेज सिटीतील आचार्य चरक ऑडिटोरियममध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा श्रद्धा भोसले प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंत भोसले, सचिव संजीव देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी ले.कर्नल रत्नेश सिन्हा, प्राचार्य डॉ.विजय जगताप, समन्वयक प्रा.नमिता नार्वेकर, प्रा.प्रणाली जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची लक्षणीय उपस्थिती कार्यक्रमात पाहायला मिळाली. सर्वांनी पदवीदान समारंभाचा पोशाख परिधान केल्याने वातावरण अधिक भव्य आणि औपचारिक झाले होते.

आपल्या भाषणात श्रद्धा भोसले यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करत सांगितले की, यश मिळवण्यासाठी सातत्य, संयम आणि प्रामाणिकता या गुणांची आवश्यकता असते. आपल्या निवडलेल्या क्षेत्राशी निष्ठा ठेवून परिश्रम केल्यास कोणतीही उंची गाठता येते. शिक्षण ही केवळ पदवी मिळवण्याची प्रक्रिया नसून समाजासाठी जबाबदारीने काम करण्याची तयारी आहे. तुमच्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी करा असेही त्या म्हणाल्या. यावेळी संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा.नमिता नार्वेकर यांनी दीक्षांत समारंभाचे महत्व आणि वैशिष्ट्ये अधोरेखित केली. डॉ.विजय जगताप यांनी कॉलेजच्या प्रगतीचा आढावा घेत संस्थेने अल्पावधीतच गुणवत्तापूर्ण शिक्षण देत जिल्ह्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले असल्याचे सांगितले. यावेळी संजीव देसाई आणि रत्नेश सिन्हा यांनीही मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. पालक प्रतिनिधींनी आपल्या भावना व्यक्त करताना संस्थेने विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षणासोबतच चांगले संस्कारही दिल्याचे नमूद केले.

समारंभाचा मुख्य क्षण म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि पालकांच्या डोळ्यांत अभिमान स्पष्ट दिसत होता. विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारी आणि कर्तव्याची शपथ देखील देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नमिता भोसले तर आभार प्रदर्शन प्रा.प्रणाली जोशी यांनी केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!