कुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

◾ रान डुक्कर रस्ता ओलांडत असतात समोरून येणाऱ्या कारची जोरदार धडक; रान डुकर जागीच ठार

 

◾ गाडीचेही नुकसान; घटनास्थळी नागरिकांनी केली गर्दी…

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी: गणेश तोडकर

🎴कुडाळ दि.०६:- रान डुक्कर रस्ता ओलांडत असताना समोरून येणाऱ्या कारची जोरदार धडक बसून रानटी डुक्कर जागीच ठार झाला .ही घटना आज दुपारच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर पणदूर येथे घडली.दरम्यान या अपघातात गाडीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.तर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.याबाबतची माहिती सावंतवाडी चे माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते सुरेश भोगटे यांनी दिली. यावेळी वनविभागाने या घटनेची दखल घ्यावी,असे त्यांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित कार महामार्गावरून जात असताना पणदूर येथे अचानक डुक्कर आडवा आला.यावेळी चालकाचा वेगावरील ताबा सुटल्यामुळे गाडीची त्याला जोरदार धडक बसली.यात रानडुक्कर गतप्राण झाला. दरम्यान महामार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती .त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!