◾ खासदार शरद पवार पणन सहकार मंत्री,कृषी मंत्री व पालकमंत्री सोबत बैठकीत कोकणातील बागायतदारांच्या समस्या सोडविणार; आ.शेखर निकम यांचे प्रयत्न..

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके

 🎴चिपळूण,दि-०५ :- मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आज शुक्रवारी दि. ५ मार्च रोजी खासदार शरद पवार यांचे उपस्थितीत आमदार शेखर निकम व आंबा,काजू, फणस बागायतदार यांची बैठक आयोजित बैठकित करण्यात आली होती.यावेळी माजी मंत्री ,खासदार शरद पवारांकडून पणन सहकार मंत्री,कृषी मंत्री व,सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. उदय सामंत,रत्नागिरी पालकमंत्री अनिल परब यांच्या सोबत लवकरच कोकणातील बागायतदारांच्या बैठकीचे आश्वासन दिले आहे.

या बैठकीला दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू देखील उपस्थित राहणार आहेत.या बैठकीत शरद पवार कोकणातील बागायतदारांच्या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांनी शरद पवार यांची भेट घेऊन कोकणातील आंबा, काजू, फणस आदी बागायतदारांचे प्रश्न मांडले होते.यासाठी आयोजित आजच्या बैठकीत आंबा, काजू, फणस बागायतदारांसोबत पवार यांनी चर्चा करून त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या व त्यातून मार्ग काढण्यासाठी लवकरच बैठकीचे आश्वासन दिले आहे.आजच्या बैठकीला आमदार शेखर निकम व माजी जिल्हा अध्यक्ष कुमार शेट्ये, ,बशीर भाई मुर्तुजा ,राजन सुर्वे, तसेच आंबा बागायतदार प्रकाश साळवी , सुरेंद्र देवळेकर, सुभाष सरये, यशवंत मयेकर, मिलिंद खानविलकर ,तसेच फणस व काजू व्यापारी मिथिलेश देसाई तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी आमदार निकम यांनी महावितरणने कोकणातील शेती पंपांना नर्सरी विभागात केलेले वर्गीकरण रद्द करून शेती विभागातच करावे याबाबत देखील शरद पवार यांच्याकडे मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!