🛑शिवाजीनगर पोलिसांची धडक कारवाई : “फुलचंद पान”साठी वापरला जाणारा मादक साठा जप्त,आरोपी जेरबंद.
*🛑शिवाजीनगर पोलिसांची धडक कारवाई : “फुलचंद पान”साठी वापरला जाणारा मादक साठा जप्त,आरोपी जेरबंद.*
*🛑दिनदयाळ हॉस्पिटल परिसरात संशयास्पद टेम्पोमधून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴पुणे, दि- ३०:-* शहरातील वाढत्या मादक पदार्थांच्या गैरवापरावर शिवाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ३ लाख ३८ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. “फुलचंद पान”मध्ये वापरल्या जाणाऱ्या मादक गोळ्यांचा हा साठा असल्याची धक्कादायक माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.
*संशयास्पद टेम्पो ठरला धागा*
दिनांक २८ एप्रिल रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला गस्तीदरम्यान गुप्त बातमी मिळाली की, दिनदयाळ हॉस्पिटलजवळील निर्जन रस्त्यावर एक मोटार टेम्पो संशयास्पद स्थितीत उभा आहे.
सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
*टेम्पोमध्ये सापडला मादक साठा*
पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित व बेकायदेशीर मादक गोळ्यांनी भरलेल्या गोण्या आढळून आल्या.
या कारवाईत टेम्पोसह एकूण ₹३,३८,८८० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
*आरोपी अटकेत, इतरांचा शोध सुरू*
तपासादरम्यान या प्रकरणात विष्णु रामरतन गुप्ता (रा. पिंपरी-चिंचवड) याचे नाव निष्पन्न झाले असून त्याला तात्काळ अटक करण्यात आली आहे.या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे.
*फुलचंद पान”मधून नशेचा धोका?*
जप्त करण्यात आलेल्या गोळ्या या अलीकडे पुण्यात “फुलचंद पान”मध्ये वापरल्या जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
यामुळे शहरातील तरुणाईमध्ये नशेचा वाढता धोका पुन्हा अधोरेखित झाला आहे.
*वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई*
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र बनसोडे, पोलीस उप आयुक्त हृषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर व त्यांच्या पथकाने ही धडक कारवाई यशस्वी केली.
*संदेश स्पष्ट – नशेखोरीविरोधात पोलिसांचा कठोर इशारा*
शहरात मादक पदार्थांच्या विक्री व वापरावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी कडक भूमिका घेतली असून, अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरूच राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

