◾ साटेली-भेडशी खालचा बाजार वळणावर आज सायंकाळी सात च्या सुमारास दोन दुचाकींमध्ये अपघात
🖥️ Kokan Live Braking News
✍️प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴साटेली-भेडशी, दि-०४:- साटेली-भेडशी खालचा बाजार वळणावर आज सायंकाळी सात च्या सुमारास दोन दुचाकींमध्ये अपघात झाला.या अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले. त्यातील एक युवक मांगेली सध्या स्थायिक साटेली-भेडशी तर दुसरा युवक परप्रांतीय साटेली-भेडशीत राहणारा आहे.
साटेली-भेडशी खालचा बाजार काजवे नजीक वळणावर ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाला. अपघाता नंतर स्थानिकांनी त्यांना साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचार झाल्यावर अधिक उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेने त्यांना गोवा बांबूळी येथे हलविण्यात आले.

