कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑ओसरगाव टोलनाक्यावरून मनसे आक्रमक; “जबरदस्ती केल्यास टोल बंद पाडू” – जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर यांचा इशारा.

*🛑ओसरगाव टोलनाक्यावरून मनसे आक्रमक; “जबरदस्ती केल्यास टोल बंद पाडू” – जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर यांचा इशारा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- २३:-* मुंबई-गोवा महामार्गाचे काम तब्बल १९ वर्षे प्रलंबित असताना, अपुऱ्या सुविधा आणि धोकादायक प्रवासाच्या पार्श्वभूमीवर ओसरगाव येथे टोलनाका सुरू करण्याचा प्रयत्न होत असल्याने मनसे आक्रमक झाली आहे. “महामार्गाचे काम पूर्ण न करता आणि नागरिकांना मूलभूत सुविधा न देता टोल वसुली करण्याचा कोणालाही अधिकार नाही. प्रशासनाने जबरदस्तीने टोल सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास मनसे हा टोलनाका बंद पाडेल,” असा थेट इशारा मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी दिला आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामातील दिरंगाईवर संताप व्यक्त करताना केसरकर म्हणाले की, अनेक ठिकाणी रस्त्याची अवस्था अत्यंत खराब आहे. काही ठिकाणी रस्ता खचलेला असून, तर काही भागात काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या कामांमुळे यापूर्वी अनेक भीषण अपघात झाले असून, अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.

याशिवाय, महामार्गालगत आवश्यक असणारे सर्व्हिस रोडच अनेक ठिकाणी अस्तित्वात नाहीत. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन मुख्य महामार्गावरून प्रवास करावा लागत आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

“या मार्गावरून रोज प्रवास करणाऱ्या स्थानिक नागरिकांवर टोलचा अतिरिक्त आर्थिक बोजा टाकणे अन्यायकारक आहे. जोपर्यंत सर्व्हिस रोडची व्यवस्था होत नाही, स्थानिक वाहनधारकांबाबत ठोस धोरण जाहीर होत नाही आणि प्रलंबित महामार्गाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत टोल सुरू करण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही,” असा ठाम इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.

दरम्यान, या गंभीर विषयावर सत्ताधारी मात्र गप्प बसल्याचा आरोप करत मनसेने त्यांच्यावरही टीका केली आहे. स्थानिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असताना प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

“रस्ता नाही, सुविधा नाही… मग टोल कशासाठी?” — असा सवाल करत मनसेने प्रशासनाला थेट आव्हान दिले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!